पावसामुळे रद्द झालेल्या स्पर्धांना प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 04:39 PM2017-09-27T16:39:49+5:302017-09-27T16:41:13+5:30
ओरोस : क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा बुधवारी सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा संकुल येथे घेण्यात आल्या. मागील आठवड्यात सतत कोसळणाºया पावसामुळे या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
ओरोस ,27 : क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा बुधवारी सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा संकुल येथे घेण्यात आल्या. मागील आठवड्यात सतत कोसळणाºया पावसामुळे या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
बुधवारी झालेल्या या स्पर्धांमध्ये १४ वर्षे वयोगटाखालील मुले व मुलींच्या खो-खो स्पर्धा तसेच १७ वर्षे वयोगटाखालील मुले व मुलींच्या कबड्डी तसेच व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडी आरपीडी हायस्कूलचे क्रीडा शिक्षक शैलेश नाईक यांच्या हस्ते औपचारिक पद्धतीने करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अचानक हवामानात बदल होऊन मागील आठ, दहा दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातच नदी, नाले, तलाव तसेच क्रीडांगणातील मैदानात पाणीच पाणी साचले होते.
दरम्यान, याचवेळी जिल्ह्यात शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पावसाळ््यात कोणत्याही शालेय क्रीडा स्पर्धांत विद्यार्थ्यांना अपघात घडू नये याकरिता या स्पर्धा आठ दिवस रद्द करून पुढे घेण्याचे आश्वासन क्रीडा विभाग तसेच आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे यांनी अधिकारीवर्गांना फोनद्वारे कळविले होते. त्यामुळे या क्रीडा स्पर्धा पुढे घेण्याचा निर्णय सर्वच शालेय शिक्षक व क्रीडापंचानी घेतला होता.
खो-खो, कबड्डी स्पर्धांनी प्रारंभ
बुधवारी जिल्हास्तरीय शालेय क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी येथे पुन्हा भरविण्यात आल्या आहे. त्यात आज १४ वर्षाखालील मुले, मुलींच्या खो-खो स्पर्धा तसेच १७ वर्षाखालील मुले-मुलींच्या खो-खो स्पर्धा तसेच १७ वर्षाखालील मुले-मुली, कबड्डी स्पर्धा, व्हॉलीबॉल स्पर्धा या स्पर्धा आज झाल्या. यात क्रीडा शिक्षक पालक व क्रीडापंचांनी आपली जबाबदारी घेत क्रीडा स्पर्धा सुरू ठेवल्या आहेत.