राज ठाकरे ३० नोव्हेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर, आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 'मनसे'ची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 12:28 PM2022-11-19T12:28:30+5:302022-11-19T12:28:58+5:30
दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेत मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले.
कणकवली : मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे ३० नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेत मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले.
जिल्ह्यात ठीकठिकाणी ग्रामपंचायत निवडणूकही होऊ घातल्या आहेत. मनसेनेही तयारी केली असल्याचे मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी सांगितले आहे. तसेच मनसे सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांची देखील मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत व येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांबाबत बैठक घेत त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.
यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव, देवगड तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष निलेश मेस्त्री, बाबल गावडे, कुणाल किनळेकर, अमोल जंगले, अमित इब्रामपूरकर, सचिन तावडे, संतोष मयेकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते