राजन तेली म्हणजे विषारी साप

By admin | Published: June 3, 2016 12:37 AM2016-06-03T00:37:35+5:302016-06-03T00:44:19+5:30

दत्ता सामंत : नारायण राणे यांनीच विष पचवले

Rajan oil means poisonous snake | राजन तेली म्हणजे विषारी साप

राजन तेली म्हणजे विषारी साप

Next

सावंतवाडी : ज्याप्रमाणे शंकराच्या गळ्यात विषारी साप आहे. त्याचप्रमाणे नारायण राणे यांच्या बाजूला राजन तेलींसारखा विषारी साप बसत असे. यामुळे राणेंच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्याचे धाडस कुणाचेच होत नसे. मात्र आता तेलींसारखा विषारी सर्प भाजपमध्ये गेल्यानेच काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. अशी जोरदार टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी तेलींवर पत्रकार परिषदेतून केली.
काँगे्रस संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद सामंत बोलत होते. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषद शिक्षण सभापती आत्माराम पालयेकर, संदीप कुडतरकर, डॉ. जयेंद्र परूळेकर, जिल्हा सरचिटणीस मंदार नार्वेकर, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, दिलीप भालेकर, गुरूनाथ पेडणेकर आदी उपस्थित होते.
यावेळी सामंत म्हणाले की, राजन तेली यांच्या टिकेला गांभिर्याने घेण्याची गरज नाही. ते काँग्रेसमध्ये कशाप्रकारे होते ते आम्ही जवळून पाहिलेले आहे. मात्र ते विषारी सापाप्रमाणे असल्याने आम्ही नारायण राणेंपर्यत पोहोचू शकत नव्हतो. तेली यांची कदाचित स्मृतीभ्रंश झालेली असेल, आमची नाही. राजन तेलींचं विष पचविण्याची ताकद फक्त नारायण राणेंमध्येच होती, भाजपमध्ये नाही, असेही सामंत यांनी सांगितले.
तेली यांचा जन्मच भाजपमध्ये दीड वर्षाचा आहे. मात्र ते आपले अस्तित्व राखण्यासाठी सत्तेला दोन वर्ष झालेल्याचा पाढा वाचत आहेत. त्यांनी विसरू नये की पहिल्या सहा महिन्यातही भाजपविरोधी केलेली जोरदार टीका यामुळे भाजपच्या भुलथापा त्यांनी जनतेसमोर मांडू नयेत. राजन तेली जातील तिथे दोन गट पडतात. स्थानिक पातळीवर भाजपमध्ये दोन गट पाडण्याचे काम तेलींचे सुरू आहे. वेंगुर्ले तालुकाध्यक्ष निवडीसाठी पक्ष श्रेष्ठीपर्यंत जावे लागले, ही दुर्दैवी बाब आहे, असेही सामंत म्हणाले. (वार्ताहर)


...तर केसरकरांचा सत्कार करू
सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले की, सर्व पर्यटक सिंधुदुर्गात उतरणार होते. गोव्याची काळजी करू पाहत असलेले पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुद्दाम धावपट्टी ३४०० मीटरवरून २४०० आणली. त्यामुळे चिपी विमानतळाचा वापर फक्त लॅन्डीगसाठी करण्याचा केसरकरांचा डाव आहे. चिपी विमानतळावर २०१७ साली विमान उतरविण्याची वल्गना करणारे केसरकर यांनी खरोखरच २०१७ साली विमान उतरवले तर जिल्हाध्यक्ष म्हणून आपण स्वत: केसरकर यांचा सत्कार करू.
- दत्ता सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष

Web Title: Rajan oil means poisonous snake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.