राजापूर तालुका यावर्षी पिछाडीवर
By Admin | Published: December 15, 2015 09:56 PM2015-12-15T21:56:08+5:302015-12-15T23:24:57+5:30
कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया : तालुक्यातील दोन ग्रामीण रूग्णालयात शून्य टक्के काम
राजापूर : यापूर्वी कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेत जिल्ह्यात अग्रणी असलेला राजापूर तालुका यावेळी काहीसा मागे पडला आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या कालखंडात तालुक्यात फक्त ३८ टक्के उद्दिष्ट पार पडल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये तालुक्यातील दोन ग्रामीण रुग्णालयांचे काम शून्य टक्के असल्याचे पुढे आले आहे.
तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांनी मात्र बऱ्यापैकी कामगिरी बजावली आहे. यावर्षी तालुक्याला ८६६ कुटुंब कल्याण नियोजनाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामध्ये ७७९ स्त्री व ८७ पुरुष नसबंदीचा समावेश होता.
यामध्ये एकही पुरुष नसबंदी झाली नसून, ३२९ स्त्रियांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामध्ये सर्वाधिक ३४ फुफेरे आरोग्य केंद्रात, तर ५ शस्त्रक्रिया राजापूर ग्रामीण रुग्णालयात पार पडल्या. ओणीत ३२ शस्त्रक्रिया ३० टक्के काम पूर्ण, करक ४० शस्त्रक्रिया ४२ टक्के, जवळेथर २० शस्त्रक्रिया ३८ टक्के, केळवली ३१ शस्त्रक्रिया ४० टक्के, कुंभवडे ३६ शस्त्रक्रिया ४५ टक्के, जैतापूर ३९ शस्त्रक्रिया ४२ टक्के, सोलगाव ३९ शस्त्रक्रिया ३६ टक्के, धारतळे ५३ शस्त्रक्रिया ४२ टक्के व राजापूर ग्रामीण रुग्णालय ५ शस्त्रक्रिया ९ टक्के असे काम मार्गी लागले आहे.
जिल्ह्यात सर्वात कुटुंबकल्याण, शस्त्रक्रिया करण्यामध्ये राजापूर तालुका आघाडीवर असायचा. मात्र, यावेळी तालुका आघाडीवर असायचा. मात्र, यावेळी मागील आठ महिन्यात तो काहीसा पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
ठिकाणपुरुषमहिला
ओणी११९५
करक - काटवली९८५
जवळेथर५४८
केळवली८७०
फुफेरे६५८
कुंभवडे८७२
जैतापूर९८४
सोलगाव११९६
धारतळे१३११३
राजापूर रुग्णालय१९
रायपाटण रुग्णालय११