राजर्षिचे विचार युवा पिढीस प्रेरणादायी : दीपक केसरकर
By admin | Published: June 26, 2017 07:06 PM2017-06-26T19:06:47+5:302017-06-26T19:06:47+5:30
सिंधुदुर्गात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी दि. २६ : शाहू महाराज हे क्रांतीकारी निर्णय घेणारे व द्रष्टे राजे होते. खेळापासून शिक्षणार्यंत व समाज उद्धारापासून सहकारापर्यंत राजर्षि शाहूंनी केलेले कार्यआजच्या युवा पिढीला प्रेरणादाई आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.
राजर्षि शाहू जयंती व सामाजिक न्याय दिवसानिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात आयोजित समारंभात पालकमंत्री केसरकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
समारंभास समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, पंचायत समिती सदस्या सुप्रिया वालावलकर, ओरोसच्या सरपंच मंगला ओरोसकर, पोलिस उपअधिक्षक संध्या गावडे, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दलितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजर्षि शाहू महाराजांनी शिक्षणाबरोबरच त्यांच्यासाठी रोजगाराच्या योजना सुरु केल्या असे सांगून पालकमंत्री केसरकर म्हणाले की, केवळ सामाजिक परिवर्तन एवढया पुरताच मयार्दीत कार्य न करता आर्थिकदृष्टया मागास असलेल्या समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध विकास योजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचे कार्य त्यांनी केले. राजर्षि शाहु महाराजांच्या जीवनाचे अनेक पैलू आज आपल्याला मार्गदर्शकअसून युवा पिढीने त्यांच्या चरित्राचे वाचन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी समाज कायार्तील राजर्षि शाहूंचे योगदान या विषयावर नवनाथ जाधव यांचे व्याख्यान झाले. समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, पंचायत समिती सदस्या सुप्रिया वालावलकर यांचीही यावेळी भाषणे झाली.
प्रारंभी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी प्रास्ताविकात राजर्षि शाहूंच्या कायार्ची माहिती विशद करुन सांगितली. समारंभास प्रा. पी. टी. सावंत, अधिक्षक गोसावी तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.