जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीत राजेंद्र रावराणे पॅनेलचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 10:51 AM2019-11-14T10:51:49+5:302019-11-14T10:53:18+5:30
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकिलांची संघटना असलेल्या जिल्हा बार असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक झाली असून या निवडणुकीत वकील राजेंद्र रावराणे ...
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकिलांची संघटना असलेल्या जिल्हा बार असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक झाली असून या निवडणुकीत वकील राजेंद्र रावराणे यांच्या पॅनेलने विजय संपादन केला आहे.
जिल्हा बार असोसिएशनची निवडणूक जिल्हा न्यायालयाच्या वकील चेंबरमध्ये पार पडली. निवडणुकीसाठी चार पॅनेल एकमेकांसमोर उभे ठाकले होते. मात्र या चार पॅनेलपैकी वकील राजेंद्र रावराणे यांच्या पॅनेलने या निवडणुकीत बाजी मारली आहे.
या पॅनेलचे पाचपैकी चार उमेदवार विजयी झाले आहेत. तर वकील अजित भणगे यांच्या पॅनेलचे अमोल मालवणकर हे एकमेव उमेदवार विजयी झाले आहेत.
या निवडणुकीत वकील राजेंद्र रावराणे, वकील अजित भणगे, वकील सुभाष पणदूरकर व वकील विद्याधर चिंदरकर ही पॅनेल उभी राहिली होती. यात वकील राजेंद्र रावराणे यांच्या पॅनेलने बाजी मारली आहे.
या बार असोसिएशन निवडणुकीत जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र रावराणे, पुरुष उपाध्यक्षपदी वकील गिरीश गिरकर तर महिला उपाध्यक्षपदी अॅड. वेदिका वीरेश राऊळ उर्फ तृप्ती सावंत आणि सहसचिवपदाच्या निवडणुकीत वकील यतीश खानोलकर हे रावराणे पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत तर सचिवपदाच्या निवडणुकीत वकील अजित भणगे पॅनेलचे अमोल मालवणकर हे विजयी झाले आहेत.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारातील वकील चेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत ५१५ वकिलांपैकी ४६६ वकिलांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला होता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वकील विलास परब यांनी काम पाहिले. या विजयानंतर विजयी सर्व वकिलांचे वकील संग्राम देसाई आदींनी अभिनंदन केले.