कोविड योद्ध्यांना राख्या, वेंगुर्ला तालुक्यात भाजपाचा अनोखा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 03:21 PM2020-08-03T15:21:12+5:302020-08-03T15:23:53+5:30
वेंगुर्ला तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद मतदारसंघात तसेच नगरपरिषद हद्दीत एकाच वेळी रक्षाबंधनाच्या दिवशी कोविड योद्ध्यांना राख्या बांधून व सन्मानपत्र देऊन अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला.
वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद मतदारसंघात तसेच नगरपरिषद हद्दीत एकाच वेळी रक्षाबंधनाच्या दिवशी कोविड योद्ध्यांना राख्या बांधून व सन्मानपत्र देऊन अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला.
जिल्हा परिषद मतदार संघ आणि शहरासह तालुक्यातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, रुग्णवाहिका चालक, पोलीस, सफाई कर्मचारी, रेशनिंग दुकानदार तसेच कोरोनाच्या महामारीत ज्यांनी प्रत्यक्षात काम केले अशा कोविड योद्ध्यांचा यात समावेश आहे, अशी माहिती भाजपाच्या महिला तालुकाध्यक्षा स्मिता दामले यांनी दिली.
पिराचा दर्गा येथील तालुका कार्यालयात पार पडलेल्या महिला कार्यकारिणीच्या बैठकीवेळी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा चिटणीस अॅड. सुषमा प्रभूखानोलकर, जिल्हा चिटणीस पूनम जाधव, माजी नगराध्यक्षा डॉ. पूजा कर्पे, जिल्हा महिला सरचिटणीस सारिका काळसेकर, महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, नगरसेविका कृपा मोंडकर, वेतोरे सरपंच राधिका गावडे, तुळस ग्रामपंचायत सदस्या श्रद्धा गोरे, मोचेमाड माजी सरपंच रसिका गावडे, आरवली महिला अध्यक्षा रिमा मेस्त्री, रेडी महिला शक्ती केंद्र प्रमुख श्रद्धा धुरी, वृंदा गवंडळकर, शांती केळुसकर, अंकिता देसाई, आकांक्षा परब, मानसी परब, वेतोरे ग्रामपंचायत सदस्या यशश्री नाईक, महिला जिल्हा कार्यकारिणी सदस्य कीर्तीमंगल भगत आदी उपस्थित होते.