परिट समाजाचा मेळावा
By admin | Published: October 26, 2015 11:39 PM2015-10-26T23:39:45+5:302015-10-27T00:07:49+5:30
खेड : शोभायात्रा आकर्षणाचा केंद्रबिंदू
चिपळूण : संत गाडगेबाबा परिट समाज संस्थेचा सहावा जिल्हा मेळावा रविवारी खेड येथे पार पडला. संत गाडगेबाबा मंदिरापासून ते द. ग. तटकरे सभागृहापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. त्यामुळे खेड शहरात परिट समाजाचा आवाज घुमला.
संत गाडगेबाबा परिट समाज संस्था जिल्हा रत्नागिरीचा सहावा मेळावा व विद्यार्थी गुणगौरव समारंभ द. ग. तटकरे सभागृहात झाला. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष दत्ताराम महाडिक हे होते. संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र परिट धोबी सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष एकनाथराव बोरसे, महासचिव सुनील पाटोळे, महिला प्रदेशाध्यक्ष कल्पना गायकवाड, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, युवक प्रदेशाध्यक्ष संतोष भालेकर, शिवाजी चव्हाण, माऊली कदम, सुनील पवार, रामेश्वर गायकवाड, प्रकाश पालकर, कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश दुर्गवले, युवा अध्यक्ष व खजिनदार मनोज शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष स्नेहा मेस्त्री, युवक जिल्हाध्यक्ष रितेश महाडिक, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष कदम, उपाध्यक्ष हसमुख पांगारकर, राजश्री घाग, मधुकर कदम, प्रकाश मोकलवार, अरुण नाकती, नरेश खेडेकर, सुहास घाग, दशरथ पावसकर, दापोली तालुकाध्यक्ष सुयोग घाग, खेड तालुकाध्यक्ष संतोष भोसले, राज्य प्रदेश युवा उपाध्यक्ष संतोष शिंदे, चिपळूण तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटेकर, संगमेश्वर तालुकाध्यक्ष राजेंद्र कदम, लांजा, राजापूर तालुकाध्यक्ष किसन चाळके यांच्यासह सर्व तालुक्यातील पदाधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी विद्यार्थी गुणगौरव समारंभ पार पडला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा सचिव दीपक कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कदम यांनी तर जिल्हा सहसचिव जगदीश कदम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
नाराजीचा सूर : पालकमंत्री आलेच नाहीत
पालकमंत्री रवींद्र वायकर हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. निमंत्रिण पत्रिकेत त्यांच्या परवानगीने नावही छापण्यात आले होते. त्यांना दोनवेळा विनंती पत्रेही देण्यात आली होती. परंतु, वायकर या कार्यक्रमाला न आल्याने अनेक समाजबांधवांनी नाराजी व्यक्त केली.