राणेंची गुरुवारी ‘गटस्थापना’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:53 PM2017-09-18T23:53:43+5:302017-09-18T23:53:43+5:30

RANCHI 'GROUP INSTALLATION' on Thursday? | राणेंची गुरुवारी ‘गटस्थापना’?

राणेंची गुरुवारी ‘गटस्थापना’?

googlenewsNext



अनंत जाधव/ रजनीकांत कदम।
लोकमत न्यूज नेटवर्क
कुडाळ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पक्ष संपवायला निघाले आहेत. त्याला मोहन प्रकाश यांची साथ आहे. चव्हाण यांची खबरेगिरी करणाºया विकास सावंत यांना त्यांनी जिल्हाध्यक्ष नेमून त्याबाबत बक्षीस दिले आहे. कर्तृत्व असणाºयाला काँग्रेस साथ देत नाही. त्यामुळे आता काँग्रेसला भविष्य राहिले नाही. येत्या २१ सप्टेंबरला घटस्थापनेदिवशी कुडाळ येथेच पत्रकार परिषद घेऊन आपला पुढील ऐतिहासिक निर्णय जाहीर करणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी कुडाळ येथे केली. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आपण समर्थ विकास पॅनेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
काँग्रेसने जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर नारायण राणे सोमवारी पहिल्यांदाच सिंधुदुर्ग दौºयावर आले होते. त्यावेळी त्यांच्या हजारो समर्थकांनी गोवा ते कुडाळ अशी रॅली काढून मोठे शक्तीप्रदर्शन केले. कुडाळ येथे महालक्ष्मी हॉलमध्ये झालेल्या जाहीर सभेला माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, कुडाळचे नगराध्यक्ष विनायक राणे, अशोक सावंत, संदीप कुडतरकर, मधुसुदन बांदिवडेकर, विकास कुडाळकर, संजू परब, विशाल परब, गोट्या सावंत, महिला जिल्हाध्यक्ष प्रणिता पाताडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी दत्ता सामंत, सतीश सावंत, संदीप कुडतरकर यांनीही मार्गदर्शन केले.
नारायण राणे यांनी या सभेत अशोक चव्हाण आणि महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, निखाºयावरची राख बाजूला झाली. जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्ता पेटला आहे. काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय नियमबाह्य आहे. आम्ही ठरवू तोपर्यंत आमची पदे कायम राहतील. त्यामुळे तुम्ही नि:संकोच काम करा. जोपर्यंत राणे सांगत नाहीत तोपर्यंत तुमची पदे कायम राहतील. राणेंच्या विरोधात डोके वर काढणे सोपे नाही. आतापर्यंत अनेकांनी प्रयत्न केला मात्र, ते आता कुठे आहेत ते माहीत नाहीत.
‘भाजपा’त जाणार की
पक्ष काढणार?
राणे यांनी अजून आपले पत्ते उघड केलेले नाहीत. घटस्थापनेदिवशी ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत, पण तो निर्णय काँग्रेस सोडण्याचा, भाजपात जाण्याचा की, नवा पक्ष काढण्याचा असेल? याविषयी उत्सुकता आहे. राणे यांचा तूर्त भाजपप्रवेश होणार नाही. दिवाळीपर्यंत ते ‘बाहेर’ राहून काँग्रेसमधून कोण-कोण सोबत येतात, याची चाचपणी करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
अशोक चव्हाणांनी काँग्रेस संपविण्याची सुपारी घेतली
सिंधुदुर्गातील सर्व सत्तास्थाने आम्ही आमच्याकडे ठेवली. कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम केले. त्याचे फळ जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून अशोक चव्हाण यांनी दिले. ते पक्ष संपविण्याचे काम करीत आहेत. तशी सुपारीच त्यांनी घेतली आहे. अशोक चव्हाण यांच्याकडून काँग्रेसचे काम महाराष्ट्रात होऊ शकत नाही. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. असे त्यांच्या निवडीनंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना सांगितले होते. मात्र, आता निर्णय जाहीर केला; आपण सहकार्य करा, असे त्यावेळी सोनिया गांधी यांनी आपल्याला सांगितले होते, असेही राणे म्हणाले.
विनायक राऊत यांना हरविल्याशिवाय
दाढी काढणार नाही : नीलेश राणे
माजी खासदार नीलेश राणे यावेळी बोलताना म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व सत्ता काँग्रेसच्या ताब्यात असताना जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याची गरज काय? अशोक चव्हाण यांचा राणे कुटुंबावर आकस आहे. रत्नागिरीमध्ये काँग्रेसची कार्यकारिणी उभारायची सोडून सिंधुदुर्गातील कार्यकारिणी रद्द करण्याचा अशोक चव्हाण यांचा हेतू काय? राणेसाहेबांच्या कार्यकर्त्यांना डिवचू नका, भविष्यात यापेक्षाही मोठा जनसागर साहेबांच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरेल. खासदार विनायक राऊत यांना हरविल्याशिवाय दाढी काढणार नाही, अशी प्रतिज्ञाही नीलेश राणे यांनी केली.
दलवाई-हलवार्इंना जागा दाखवू : नीतेश राणे
यावेळी आमदार नीतेश राणे म्हणाले की, खासदार हुसेन दलवार्इंनी जिल्ह्यात काँग्रेसच्या बैठकीच्यावेळी नारायण राणेंची तोंडभरून स्तुती केली आणि जिल्ह्याची हद्द ओलांडल्यानंतर असे काय झाले की ते राणेंवर टीका करायला लागले.
जर तुम्हाला जिल्हा कार्यकारिणी आणि आमच्याबद्दल आक्षेप असता तर त्यांनी आपल्याला सभेत सांगायला हवे होते. तसे न करता पाठीमागून राजकारण करण्याची काँग्रेसची परंपरा त्यांनी दाखवून दिली. हे दलवाई आहेत की हलवाई त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, अशी जहरी टीका केली.
फक्त तुम्ही पाठीशी रहा; ३१ जिल्हे पाठीशी
घटस्थापनेदिवशी मी माझा निर्णय जाहीर करणार त्यावेळी कोण कोणाला धक्का देतो ते पाहू. महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि कोकणी जनतेच्या भल्यासाठी मी आणि माझे दोन्ही पुत्र राजकारणात आहोत. फक्त तुम्ही माझ्या पाठीशी रहा. राज्यातील ३१ जिल्हे माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे आता कोणाला घाबरत नाही. उघडपणे भूमिका घेणार, फक्त तुम्ही आतापर्यंत जशी साथ दिली, तशीच साथ द्या, असे आवाहन राणे यांनी केले.

Web Title: RANCHI 'GROUP INSTALLATION' on Thursday?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.