राणेंनी निवडणुकीला २०२४ मध्ये उभे राहून दाखवावेच -वैभव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 07:04 PM2020-11-04T19:04:17+5:302020-11-04T19:10:29+5:30

NarayanRane, shiv sena, bjp, vaibhavnaik, sindhdurugnews नारायण राणे शिवसेनेला आव्हान देतात आणि त्यानंतर स्वतःच बाजूला होतात. २०१९ च्या निवडणुकीतून राणेंनी असेच केले होते. परंतु २०२४ च्या निवडणूकित राणेंनी उभे राहून दाखवावे असे आव्हान आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंना दिले आहे.

Rane should stand for election in 2024 - Vaibhav Naik | राणेंनी निवडणुकीला २०२४ मध्ये उभे राहून दाखवावेच -वैभव नाईक

राणेंनी निवडणुकीला २०२४ मध्ये उभे राहून दाखवावेच -वैभव नाईक

googlenewsNext
ठळक मुद्देराणेंनी निवडणुकीला २०२४ मध्ये उभे राहून दाखवावेच -वैभव नाईकराणेंनी शिवसेनेवर केलेल्या टिकेला आमदार वैभव नाईक यांचे प्रतिउत्तर

कणकवली : नारायण राणे शिवसेनेला आव्हान देतात आणि त्यानंतर स्वतःच बाजूला होतात. २०१९ च्या निवडणुकीतून राणेंनी असेच केले होते. परंतु २०२४ च्या निवडणूकित राणेंनी उभे राहून दाखवावे असे आव्हान आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंना दिले आहे.

नारायण राणेंनी शिवसेनेवर केलेल्या टिकेला आमदार वैभव नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून प्रतिउत्तर दिले आहे. या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, नारायण राणेंनी शिवसेना संपविण्याची जेव्हा जेव्हा भाषा केली त्यानंतर शिवसेना आजवर पहिल्या पेक्षा दुप्पटिने वाढली आहे.

शिवसेनेचा आता मुख्यमंत्री देखील आहे. राणेंनी दिलेले आव्हान शिवसेनेने २०१४ सालीच मोडून काढले आहे. २०१४ मध्ये राणेंचा पराभव माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाने केला. त्याचबरोबर त्यांच्या मोठ्या मुलाचा देखील सलग २ वेळा शिवसेनेने पराभव केला.

राणेंना माहितच असेलच गेल्या निवडणुकीत त्यांचा छोटा मुलगा पक्ष बदलून भाजपा मधून उभा राहिला नसता तर तोही पराभूत झाला असता. राणें २०१९ च्या निवडणुकीतही स्वतः उभे राहिले नाहीत.

त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत राणेंनी उभे राहून दाखवावे. तसे झाले तर कोकणातून शिवसेनेचे ११ आमदार येतात की २१ ते त्यांना त्यावेळी कळेल. असेही या प्रसिध्दीपत्रकात वैभव नाईक यांनी म्हटले आहे.
 

Web Title: Rane should stand for election in 2024 - Vaibhav Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.