Sindhudurg- मालवणमध्ये राणे-ठाकरे समर्थकांमध्ये राडा: ४२ जणांसह अनोळखी दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 02:26 PM2024-08-29T14:26:52+5:302024-08-29T14:27:36+5:30

मालवण: राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी बुधवारी आलेले युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे व भाजपाचे खासदार ...

Rane-Thackeray supporters during the inspection of the fallen statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Rajkot Cases have been filed against 150 unknown activists including 42 people in the Rada case | Sindhudurg- मालवणमध्ये राणे-ठाकरे समर्थकांमध्ये राडा: ४२ जणांसह अनोळखी दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Sindhudurg- मालवणमध्ये राणे-ठाकरे समर्थकांमध्ये राडा: ४२ जणांसह अनोळखी दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

मालवण: राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी बुधवारी आलेले युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे व भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. यात एक पोलिस कर्मचारी आणि एक महिला जखमी झाली. याप्रकरणी ४२ जणांसह अनोळखी दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी याबाबत माहिती दिली.

गर्दी, मारामारी, घोषणाबाजी, शासकीय कामात अडथळा, लोकसेवकांना त्यांच्या कामात धाक दाखवून परावृत्त करणे, दुखापत करणे, जिल्ह्यात सुरू असलेल्या मनाई आदेशाचा भंग करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे अशा विविध कलमानुसार दोन्ही गटातील कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे हे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Rane-Thackeray supporters during the inspection of the fallen statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Rajkot Cases have been filed against 150 unknown activists including 42 people in the Rada case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.