राणेंवरची टीका नडली, शिवसेना तोंडावर आपटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 12:29 PM2021-01-30T12:29:58+5:302021-01-30T12:36:33+5:30

Nilesh Rane Sindhudurgnews- नारायण राणेंवर टीका करून मते मागण्याएवढे मतदार दूधखुळे राहिले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची तत्त्वे धुळीस मिळविल्याने त्याचा जनता मतदानातून राग काढत आहे.

Rane was criticized, Shiv Sena was slapped in the face | राणेंवरची टीका नडली, शिवसेना तोंडावर आपटली

राणेंवरची टीका नडली, शिवसेना तोंडावर आपटली

Next
ठळक मुद्देराणेंवरची टीका नडली, शिवसेना तोंडावर आपटलीभाजपला भविष्यातही यश :निलेश राणे

मालवण : नारायण राणेंवर टीका करून मते मागण्याएवढे मतदार दूधखुळे राहिले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची तत्त्वे धुळीस मिळविल्याने त्याचा जनता मतदानातून राग काढत आहे.

पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, दीपक केसरकर यांची विकास करण्याची कुवत नसल्यानेच त्यांना नाकारत कोकणातील जनतेने ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तोंडावर आपटले, अशी टीका भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी केली.

मालवण येथील निलरत्न निवासस्थानी राणे यांची पत्रकार परिषद झाली. गयावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, दीपक पाटकर, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, नगरसेवक गणेश कुशे, विजय केनवडेकर, महेश मांजरेकर आदी उपस्थित होते.

राणे यांनी निवडणुकीतील विजयाचे श्रेय मालवणच्या पदाधिकाऱ्यांना दिले. जनतेने पुन्हा एकदा राणे व भाजपवर विश्वास ठेवला. रत्नागिरीतही ३०१ सदस्य भाजपचे निवडून आले. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपलाच यश मिळेल, असा विश्वास राणेंनी व्यक्त केला.

राणे म्हणाले, शिवसेनेचे मुख्यमंत्री कोकणचा विकास करण्यास अपयशी ठरले. आमदार नाईकला आमदारकी समजत नाही. त्यामुळे उदय सामंत आणि विनायक राऊत यांनी त्यांचा पद्धतशीर गेम केला आहे. आम्हांला कोरोना दिसला. मात्र, दीपक केसरकर कुठे दिसलेच नाहीत. वैभव नाईकची २०२४ ची निवडणूक शेवटची असेल.

खासदाराची अंगणवाडी सुरू करण्याची कुवत नाही. त्याला केवळ राणेंवर भुंकण्याचे काम मातोश्रीने दिले आहे. चिपी विमानतळाच्या परवानग्या तसेच कराराच्या प्रक्रिया पूर्ण व्हायच्या असून विमानतळ आम्हीच सुरू करू, सत्ताधारी केवळ तारखा जाहीर करत आहेत, असेही ते म्हणाले.

उदय सामंत हे पोर्तुगीजांप्रमाणे बोलबच्चन

उदय सामंत पोर्तुगीजांप्रमाणे बोलबच्चन आहेत. रत्नागिरीतील दरोडेखोरीची संस्कृती त्यांनी सिंधुदुर्गात आणली आहे.
जिल्ह्यातील सर्व रस्त्यांचे ठेके त्यांच्या भावाने घेतले असून डांबरचोर जनतेच्या पैशांवर दरोडा टाकत आहेत. यात विनायक राऊत व त्याच्या मुलाचा वेगळा मीटर सुरू केला आहे. त्यामुळे या डांबरचोरांकडून जनतेने कोणत्या अपेक्षा ठेवायच्या? असा सवाल करत राणेंनी कोकणचा विकास आम्हीच करू, असे सांगितले.

Web Title: Rane was criticized, Shiv Sena was slapped in the face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.