Maharashtra Vidhan Sabha 2019 : राणे नक्कीच सुधारतील, केसरकर यांनीही दिले प्रमाणपत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 17:45 IST2019-10-12T13:50:28+5:302019-10-12T17:45:36+5:30
शिवसेनेबद्दल असलेली कटुता नारायण राणे यांनी संपवावी,ही माझी भूमिका होती. तसा निर्णय त्यांनी घेतल्यास ते नक्कीच सुधरतील, परंतु कटुता निर्माण करण्यासारखी राणेंनी केलेली वक्तव्ये तपासून पाहिली पाहिजेत,असा टोला पालकमंत्री तथा शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषद लगावला.

Maharashtra Vidhan Sabha 2019 : राणे नक्कीच सुधारतील, केसरकर यांनीही दिले प्रमाणपत्र
सावंतवाडी : शिवसेनेबद्दल असलेली कटुता नारायण राणे यांनी संपवावी, ही माझी भूमिका होती. तसा निर्णय त्यांनी घेतल्यास ते नक्कीच सुधारतील, परंतु कटुता निर्माण करण्यासारखी राणेंनी केलेली वक्तव्ये तपासून पाहिली पाहिजेत, असा टोला पालकमंत्री तथा शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषद लगावला. दरम्यान भाजप पुरस्कृत म्हणून उभे असलेल्या राजन तेलींवर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, असे असताना ते निवडणूक लढवित आहेत, ते फ्रॉड आहेत, असा ही आरोप यावेळी त्यांनी केला.
ज्या नितेश राणेंनी मोदींचे व्यंगचित्र काढले होते. तसेच शिवसेना प्रमुखांवर टीका करणा-या लोकांना जनता स्वीकारणार नाही, असा ही आरोप त्यांनी केला. आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी संदेश पारकर, जयेंद्र परूळेकर आदी उपस्थित होते.