राणेंना काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री करण्याचा कोणीच शब्द दिला नव्हता : सुधीर सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 05:58 PM2017-09-28T17:58:54+5:302017-09-28T18:01:26+5:30

नारायण राणे यांना मुख्यमंत्री पदाबाबत कॉँग्रेसमध्ये कोणीच शब्द दिला नसल्याचा गौप्यस्फोटही ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना केला. काँग्रेस आणि भाजपा हे एकाच माळेचे मणी आहेत. ते श्रीमंत आणि भांडवालदारांचे पक्ष आहेत. त्यामुळे या पक्षात आपण जाणार नाही. तर बिगर राजकीय पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा आपला मानस असून त्याबाबतची अधिकृत घोषणा जानेवारीमध्ये करणार असल्याची माहीती देत काँग्रेस आणि भाजपावर सडकून टीका केली.

Raneena did not give any words to make Congress chief: Sudhir Sawant | राणेंना काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री करण्याचा कोणीच शब्द दिला नव्हता : सुधीर सावंत

राणेंना काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री करण्याचा कोणीच शब्द दिला नव्हता : सुधीर सावंत

Next
ठळक मुद्दे सुधीर सावंत यांचा गौप्यस्फोट काँग्रेस, भाजप हे एकाच माळेचे मणी, काँग्रेसमध्ये परतण्याचा केला इन्कारराज्याचा मुख्यमंत्री भांडवलदार ठरवतातगैर काँग्रेस गैर भाजपा आघाडी स्थापन करणार!

सिंधुदुर्गनगरी, 28 : काँग्रेस आणि भाजपा हे एकाच माळेचे मणी आहेत. ते श्रीमंत आणि भांडवालदारांचे पक्ष आहेत. त्यामुळे या पक्षात आपण जाणार नाही. तर बिगर राजकीय पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा आपला मानस असून त्याबाबतची अधिकृत घोषणा जानेवारीमध्ये करणार असल्याची माहीती देत काँग्रेस आणि भाजपावर सडकून टीका केली. नारायण राणे यांना मुख्यमंत्री पदाबाबत कॉँग्रेसमध्ये कोणीच शब्द दिला नसल्याचा गौप्यस्फोटही ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

ब्रिगेडियर सुधीर सावंत हे आपल्या स्वगृही परतणार अर्थात पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार आदी वृत्ते प्रसिद्ध होताच गुरूवारी येथील छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ब्रिगेडियर सुधीर सावंत बोलत होते. यावेळी आम आदमी पार्टीचे धनंजय शिंदे उपस्थित होते.

यावेळी बोलताना ब्रिगेडियर सावंत म्हणाले की, नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिट्टी दिल्याने आपण पुन्हा स्वगृही परतणार आहोत. काँग्रेस पक्षात प्रवेश करणार अशी वृत्ते प्रसिद्ध होत आहेत. मुळात काँग्रेस पक्षाने लोकविरोधी कार्यक्रमांची अंमलबजावणी केली.

शेतकºयांच्या जीवावर उठणारे प्रकल्प आणले. त्याला आपला विरोध असल्याने आपण काँग्रेसला सोडचिट्टी दिली होती. काँग्रेसची विचारसरणी ही जनतेच्या विरोधात आहे. काँग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांनी जनतेचा पैसा जमा केला आणि तो भांडवलदारांना देण्यास सुरुवात केली. या प्रवृत्तीचा आपल जाहीर निषेध करीत असल्याचे यावेळी सुधीर सावंत यांनी सांगितले.


काँग्रेस पक्ष हा जनतेच्या विरोधात काम करीत असल्याने त्यावेळी आपण आपल्या आमदारकीच्या राजीनामा दिला. भ्रष्टाचारी पक्षात जाण्यापेक्षा आपली नवीन पक्ष स्थापन करू असे सांगत काँग्रेस पक्षाच्या वाटेवर आपण असल्याच्या वृत्ताला खोडून आपण काँग्रेस पक्षात पुन्हा जाणार नसल्याचे ब्रिगेडियर सावंत यांनी स्पष्ट केले.

गैर काँग्रेस गैर भाजपा आघाडी स्थापन करणार!


गांधी आणि मोदी हे सद्या जनतेच्या पैशाने भांडवलदारांचे खीसे भरत असल्याचा आरोप करत जनतेला लुबडणाºया आणि भ्रष्टाचार राजकारणात जनता बेदखल झाली आहे. त्यामुळे जनतेला न्याय देणाºया पक्षाची आवश्यकता आहे. त्यामुळे आपण गैर काँग्रेस , गैर भाजपा आघाडी स्थापन करणार आहेत. याची अधिकृत घोषणा जानेवारीमध्ये करण्यात येणार आहे. जनतेने या आघाडीला सहकार्य करावे असे आवाहन ही सावंत यांनी केले. नारायण राणे जेव्हा काँग्रेस पक्षात आले तेव्हा मीही काँग्रेसमध्येच होतो. राणेंशी चर्चा झाली त्या बैठकीच्यावेळी मीही तेथे उपस्थित होतो. मात्र नारायण राणे यांना काँग्रेस पक्षाने केव्हाही मुख्यमंत्री पदाचा शब्द नसल्याचा गौप्यस्फोट सावंत यांनी केला.

राज्याचा मुख्यमंत्री भांडवलदार ठरवतात

भाजपाच्या सरकारमध्ये आमदार खासदारांना किंमत नाही. पक्षाच्या नेता सांगेल तसे त्यांना वागावे लागते, असा आरोप करत राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार हे देशासह राज्यातील भांडवलदार ठरवित असल्याचा आरोप करत आपला या प्रवृत्तीला विरोध असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: Raneena did not give any words to make Congress chief: Sudhir Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.