राणेंची वक्तव्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसाठी धोकादायक !,संदेश पारकर यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 04:09 PM2020-10-28T16:09:03+5:302020-10-28T16:11:14+5:30
Politics, Uddhav Thackeray, Shiv Sena, Narayan Rane, Sandesh Parkar, sindhudurg मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या आक्रमक भाषणानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांच्या दोन पुत्रांनी सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडून ठाकरे यांच्यावर टीका केली . माजी मुख्यमंत्री असलेल्या राणे यांनी टीका करताना आपल्या भाषेला मर्यादा घालण्याची गरज आहे . कारण त्यांची वक्तव्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसाठी धोकादायक आहेत, अशी टीका शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केली आहे .
कणकवली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या आक्रमक भाषणानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांच्या दोन पुत्रांनी सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडून ठाकरे यांच्यावर टीका केली . माजी मुख्यमंत्री असलेल्या राणे यांनी टीका करताना आपल्या भाषेला मर्यादा घालण्याची गरज आहे . कारण त्यांची वक्तव्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसाठी धोकादायक आहेत, अशी टीका शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केली आहे .
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की , राणे यांचा पूर्वइतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे . राणे सध्या ज्या - पक्षात आहेत , त्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी तो भर विधानपरिषदेत वाचूनही दाखविला होता . राणे यांची आज जी काही ओळख आहे , ती फक्त ठाकरे कुटुंबामुळे आहे , हे राणेंनी लक्षात ठेवले पाहिजे . साहजिकच स्वत : ला ओळख मिळवून देणाऱ्या ठाकरे कुटुंबातीलच सदस्यावर राणेंनी पुराव्याशिवाय केलेली चिखलफेक निषेधार्ह आहे .
राणे हे सत्ताधारी पक्षाचे खासदार असल्याने त्यांचे म्हणणे ते आपल्या नेत्यांकडे मांडू शकतात . पण , कसलाही पुरावा नसताना एखाद्या चांगल्या व्यक्तीचे असे चारित्र्यहनन करणे चुकीचे आहे . राणे शिवसेनेत होते , तेव्हा त्याच पक्षाच्या नेतृत्वाचा त्यांनी उद्धार केला . नंतर काँग्रेसमध्ये गेल्यावर काँग्रेस पक्ष आणि विलासराव देशमुख , अशोक चव्हाण अशा नेत्यांवर टीका केली . त्यानंतर स्वत:चा पक्ष काढल्यावर पंतप्रधान मोदींवरही टीका केली होती .
आता राणे भाजपमध्ये असून उद्या भाजप सोडायची वेळ आली , तर ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरही टीका करतील . राणेंची ही वक्तव्ये त्यांच्या दोन्ही मुलांचे भविष्यात नुकसान करणार हे निश्चित आहे , असेही पारकर यांनी या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.