दुर्मिळ किंग कोब्राला ठेचून मारले, दोडामार्ग परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 06:24 PM2022-06-21T18:24:38+5:302022-06-21T18:25:01+5:30

किंग कोब्रा हा वर्ग एक क्रमांकाच्या संरक्षित प्रजातीमध्ये मोडला जातो. त्यामुळे या सापाची अशाप्रकारे क्रूर हत्या करणे हा खूप मोठा गुन्हा आहे.

Rare King Cobra crushed, incident in Dodamarg area | दुर्मिळ किंग कोब्राला ठेचून मारले, दोडामार्ग परिसरातील घटना

दुर्मिळ किंग कोब्राला ठेचून मारले, दोडामार्ग परिसरातील घटना

Next

आंबोली : दोडामार्ग- मांगेली येथे किंग कोब्रा या जगातील सर्वात लांब विषारी सापाला ठेचून मारण्यात आल्याची घटना घडली आहे. अतिशय धोक्यात असलेला व दुर्मिळ किंग कोब्रा या सापाला अशाप्रकारे ठेचून मारणे ही अतिशय दुर्दैवाची घटना असल्याचे निसर्गप्रेमींन मधून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

दोडामार्ग हा परिसर जैवविविधता दृष्ट्या अतिशय संवेदनशील समजला जातो. याठिकाणी वाघाचे अस्तित्व हत्तीचे अस्तित्व ,काळा बिबट्याचे अस्तित्व या अगोदर अधोरेखित झाले आहे. त्याशिवाय काही वर्षांमध्ये याठिकाणी किंग कोब्रा यांचे सुद्धा अस्तित्व सर्प इंडिया या संस्थेच्या माध्यमातून अधोरेखित झाले. किंग कोब्रा हा वर्ग एक क्रमांकाच्या संरक्षित प्रजातीमध्ये मोडला जातो. म्हणजेच वाघाला जे संरक्षण आहे तेच संरक्षण या सापाला सुद्धा आहे. त्यामुळे या सापाची अशाप्रकारे क्रूर हत्या करणे हा खूप मोठा गुन्हा आहे. या प्रकरणी दोषी असलेल्यांना व पुरावे नष्ट करू पाहणाऱ्यांना चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

जनजागृती गरजेची

सर्प इंडियाचे सदस्य चित्रा पेडणेकर यांना विचारले असता त्यांनी लोकांमध्ये सापांविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. अन्यथा अशा प्रकारचे साप नेहमी मारले जातील. वन विभागाच्या माध्यमातून तरबेज सर्पमित्र प्रशिक्षित केले पाहिजे. म्हणजे अशाप्रकारे साप मारले जाणार नाही.

Web Title: Rare King Cobra crushed, incident in Dodamarg area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.