नगराध्यक्षपद खुले झाल्याने ‘रस्सीखेच’

By admin | Published: October 9, 2016 11:30 PM2016-10-09T23:30:38+5:302016-10-09T23:30:38+5:30

राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी : रुसव्या-फुगव्याचे रंगणार चित्र

Rashikachh to be the head of the municipality | नगराध्यक्षपद खुले झाल्याने ‘रस्सीखेच’

नगराध्यक्षपद खुले झाल्याने ‘रस्सीखेच’

Next

सिद्धेश आचरेकर ल्ल मालवण
मालवण पालिकेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक ही जिल्ह्यासह राज्यात प्रतिष्ठेची मानली जाते. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जाणारी मालवण पालिका २०१७ मध्ये शतकोत्सव साजरा करणार आहे. त्याआधी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होत असलेल्या पालिकेच्या निवडणुकीचे वेध सुरू झाले आहेत. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या ५ आॅक्टोबरच्या पालिका नगराध्यक्षपद आरक्षणाच्या सोडतीत मालवण पालिकेला अपेक्षेप्रमाणे ‘खुले’ सर्वसाधारण आरक्षण निश्चित करण्यात आले. खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्याने आता राजकीय पक्षांनी नगराध्यक्ष निवडीपासून नगरसेवकांच्या चाचपणीस सुरुवात केली आहे. राजकीय पक्षांकडून अद्याप नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची नावे निश्चित झाली नसली, तरी अनेक विद्यमान व इच्छुक उमेदवार नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याच्या मानसिकतेत आहेत.
गतवर्षी मालवण पालिकेच्या निवडणुकांसाठी अडीच वर्षांसाठी महिला आरक्षण जाहीर करण्यात आले होते. मात्र, यावर्षी शासनाने नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून देण्याचे जाहीर केल्याने तेच आरक्षण कायम राहणार की, दुसरे आरक्षण पडणार याची उत्सुकता होती. शहरातील उमेदवारांना अपेक्षित आरक्षण पडल्याने पुरुष उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या धर्तीवर अनेक नगरसेवकांनी प्रभागात सक्रियता दर्शवत कामे सुरू केली आहेत. नव्या दमाचे उमेदवारही प्रभागात सामाजिक उपक्रमातून मतदारांसमोर येण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. काँग्रेस, शिवसेना, भाजप या पक्षांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात राष्ट्रवादी व मनसे हे पक्ष अद्यापही सक्रिय झाल्याचे दिसून येत
नाही.
पुरुष उमेदवारांत उत्साह
पालिकेचे आरक्षण खुले सर्वसाधारण जाहीर झाल्याने पाण्यात देव ठेवलेल्या उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आरक्षण नेमके कोणते पडणार याच्यावर निवडणुकीचे फासे पडणार होते. आता आरक्षण खुले निश्चित झाल्याने सर्व पक्षांकडून गणिते मांडली जात आहेत. नगराध्यक्ष पदासाठी प्रभागासोबत इच्छुक तसेच विद्यमान नगरसेवकांनी लोकसंपर्क वाढवला आहे. त्यामुळे या लोकप्रतिनिधींना वरिष्ठांची मने जिंकण्याची मोठी कसरत करावी लागणार आहे. काही इच्छुक उमेदवार आपल्या सोयीनुसार राजकीय पक्षांत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. अनेकांचे भवितव्यही ‘जर-तर’वर असून पक्ष त्यांना कितपत दाद देतो, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
चढाओढ आणि मनधरणी
नगराध्यक्ष हे पद शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यात खुले आरक्षण पडल्याने अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता ‘मीच नगराध्यक्ष होणार’ अशा भ्रमात राजकीय पुढारी असल्याचे आताच्या घडीला दिसून येत आहे. मी शहरात चांगल्याप्रकारे काम केले आहे. त्यामुळे मला जनता निवडून देईल, असे इच्छुक उमेदवारांच्या भेटीदरम्यान ऐकायला येत आहे. मात्र, ही गणिते स्थानिक पातळीवर कितीही मांडली तरी शहराच्या राजकारणासाठी व विकासासाठी चांगल्या दर्जाचे चेहरे देणे हे वरिष्ठांना महत्त्वाचे आहे. वरिष्ठांची मनधरणी करणे, त्यांचे मन जिंकणे आदी प्रकार इच्छुक उमेदवारांना करावे लागणार आहेत. तसेच नगराध्यक्षपदाला महत्त्व असल्याने एकाच पक्षात अनुभवी तसेच नवखे चेहरे इच्छुक आहेत. त्यामुळे राजकीय पक्षातही नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी मोठी रंगतदार ‘चढाओढ’ असणार आहे. काहीवेळा अंतर्गत ‘रुसवे-फुगवे’ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
कोणता झेंडा घेऊ हाती?
नगराध्यक्ष या महत्त्वाच्या पदासाठी अनेक इच्छुक रिंगणात उतरणार आहेत. काहींना जर पक्षाकडून ऐनवेळी धक्का मिळाला तर दुसऱ्या पक्षाचा झेंडा घेण्याच्या तयारीतही ते लोकप्रतिनिधी असल्याचे बोलले जात आहे. पालिकेच्या राजकारणात काँग्रेसचा दबदबा राहिला आहे, तर शिवसेना, राष्ट्रवादी याही पक्षांचा काळानुरूप वरचष्मा राहिला आहे. भाजप या निवडणुकीत पालिका इतिहासात खाते उघडण्याच्या तयारीत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनीही शहरात गेल्या वर्षभरात पक्षवाढीसाठी जोर लावला आहे. त्यामुळे जनमत आपल्याकडे वळविण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर असणार आहे. पालिकेच्या विद्यमान नगरसेवकांतील तीन ते चार उमेदवार अन्य पक्षांचा झेंडा खांद्यावर घेऊन निवडणूक लढविणार आहेत. उपनगराध्यक्ष राजन वराडकर हे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. वराडकर हे संदेश पारकर समर्थक आहेत. पारकर यांनी भाजपात प्रवेश केल्याने जवळ जवळ वराडकर भाजपात जाण्याच्या तयारीत आहेत. असे असले तरी पक्ष प्रवेशाबाबत वराडकर यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही.
नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतील संभाव्य नावे
४आरक्षण खुले सर्वसाधारण प्रर्वगासाठी झाल्याने अनेकांनी शहरात वैयक्तिक पातळीवर लोकसंपर्क वाढला आहे. अद्याप एकाही राजकीय पक्षाकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित अथवा जाहीर झाला नसला तरी संभाव्य मोठी भाऊगर्दी दिसून येत आहे. काँग्रेसकडून विद्यमान नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांच्यासह माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर हेही यावेळच्या निवडणूक नगराध्यक्षपदाचे उमेदवार असू शकतात. पालिकेच्या राजकारणात आचरेकर यांना ‘किंगमेकर’ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे काँग्रेसकडून उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक मंदार केणी व

Web Title: Rashikachh to be the head of the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.