रातांबाही होणार आता व्यावसायिक पीक

By admin | Published: June 9, 2015 11:08 PM2015-06-09T23:08:28+5:302015-06-10T00:29:42+5:30

एका झाडाला साधारणत: ७० ते ८० किलो फळे लागतात. फळामध्ये सी व्हिटमिन्सची उपलब्धता भरपूर आहे. फळाची चव आंबट असून त्यात आढळणारे आम्ल उपयुक्त आहे

Ratan is going to be a commercial crop | रातांबाही होणार आता व्यावसायिक पीक

रातांबाही होणार आता व्यावसायिक पीक

Next

मेहरून नाकाडे ल्ल रत्नागिरी
केंद्र शासनाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोकमला प्रमुख कृषी व फलोत्पादन पिकांचे भौगोलिक उपदर्शन मानांकन दिले आहे. त्यामुळे जगभर कोकमची विक्री वाढणार असल्यामुळे आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या रातांबा लागवडीला चालना मिळणार असून, त्याला व्यावसायिक स्वरुप येणार आहे.उष्ण दमट हवामान रातांब्यासाठी पोषक असल्यामुळे किनारपट्टीलगत ही झाडे प्रामुख्याने आढळतात. रत्नागिरी जिल्ह्यात ११४ हेक्टर क्षेत्रावर रातांब्याची झाडे आहेत. हेक्टरी २०० प्रमाणे २२ हजार ८०० इतकी झाडे कोकम लागवडीखाली आहे. कोरडवाहू झाड असल्यामुळे या झाडांना पाण्याची फारशी आवश्यकता फासत नाही. सुमारे १५ ते १८ मीटर उंचीएवढे झाड वाढते. झाडाची कोवळी पाने तांबड्या, तर जून पाने हिरव्या रंगाची असतात. लागवडीनंतर सात ते आठ वर्षात झाडाला फळधारणा होऊन उत्पादन मिळते.नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये झाडाला फुलोरा येतो. हिरवट आकाराची छोटी छोटी फळे लागतात. २.५ ते ३.० सेंटीमीटर व्यासाची फळे पिकल्यानंतर तांबडी होतात. यामध्ये पांढरट गर बियासह आढळतो. एका झाडाला साधारणत: ७० ते ८० किलो फळे लागतात. फळामध्ये सी व्हिटमिन्सची उपलब्धता भरपूर आहे. फळाची चव आंबट असून त्यात आढळणारे आम्ल उपयुक्त आहे. मूळव्याध, ट्युमर, संग्रहणी, वेदना, हृदयसमस्येत उपयुक्त ठरणारे आहे. पक्वाशयात पित्तरसाचा स्त्राव वाढविणारे औषध म्हणून वापरले जाते. ऊष्माघातासाठी कोकम सिरप उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे अ‍ॅलर्जी झाल्यासही त्याचा वापर केला जातो. कोकमाच्या फळापासून रस तयार केल्यानंतर राहिलेल्या बियांपासून तेल तयार केले जाते. आयुर्वेदामध्ये तेलाचे महत्व विषद केले आहे. पायांच्या विकारात, संधीवातावर या तेलाचा वापर केला जातो. तूप समतूल्य तेल असून, बियामध्ये २३ ते २६ टक्के तेलाची मात्रा असल्याने सौंदर्य प्रसाधने व औषधांमध्ये याचा वापर केला जातो. कोकम रस, गर, बियांच्या वापराबरोबर फळाची साल उन्हात वाळवल्यानंतर त्याचा वापर स्वयंपाकात केला जातो. त्यामुळे वाळवलेल्या कोकमाला विशेषत: मागणी आढळते. रोजगार हमी योजनेतून कोकम लागवड करण्यात आली तरी नैसर्गिकरित्या उगवलेल्या झाडांपासून उत्पादन घेण्यात येत आहे. या लागवडीसाठी फारशी चालना मिळालेली नाही. परंतु भविष्यात ही वाढण्याची शक्यता आहे. कृषी विद्यापीठातर्फे संशोधन सुरू आहे. कोकम रस किंवा सिरपसाठी काही कलमे विकसीत करण्यात आली आहे. कोकमची कलमे रोपवाटिकेत तयार करण्यात आली आहे.
भविष्यात कोकम रस, तेल, कोकमला जगभरातून मागणी वाढल्यास शेतकरीबंधू निश्चितच लागवडीचा विचार करतील. आंब्याचे उत्पन्न निसर्गच्या दृष्टचक्रात सापडल्यामुळे कोकम लागवड पर्याय ठरू शकतो. मात्र त्यासाठी कोकम उत्पादने मर्यादीत न राहता कारखानदारी वाढणे गरजेचे आहे.

Web Title: Ratan is going to be a commercial crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.