५४वी राज्य हौशी संगीत नाट्य स्पर्धा रत्नागिरीत

By admin | Published: December 14, 2014 09:24 PM2014-12-14T21:24:34+5:302014-12-14T23:54:41+5:30

जानेवारीत कार्यक्रम : अंतिम फेरी पाहायला रसिक उत्सुक

Ratnagiri 54th State Amateur Music Theater Competition | ५४वी राज्य हौशी संगीत नाट्य स्पर्धा रत्नागिरीत

५४वी राज्य हौशी संगीत नाट्य स्पर्धा रत्नागिरीत

Next

रत्नागिरी : महाराष्ट्र शासन सांस्कृ तिक कार्य संचालनालय आयोजित ५४व्या महाराष्ट्र राज्य हौशी संगीत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी दि. १५ जानेवारीपासून रत्नागिरीत होणार आहे. सावरकर नाट्यगृह येथे दररोज सायंकाळी ७ वाजता संगीत नाटक सादर केले जाणार आहे.
गतवर्षीच्या संगीत नाटक स्पर्धेत खल्वायन संस्थेने प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल यावर्षीसुद्धा संगीत नाट्य स्पर्धेचे यजमानपद रत्नागिरीला प्राप्त झाले आहे. त्यामुळे दि. १५ जानेवारी ते ४ फेब्रुवारीअखेर विविध स्पर्धकांकडून संगीत नाटके सादर केली जाणार आहेत. शुभारंभाच्या दिवशी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नांदेडतर्फे सं. स्वयंवर नाटक सादर केले जाणार आहे.
दि. १६ रोजी आश्रय सेवा संस्था, रत्नागिरीतर्फे सं. मत्स्यगंधा, दि. १७ रोजी अष्टगंधा, गोवातर्फे सं. सौभद्र, दि. १८ रोजी अश्वमेध, कल्याणतर्फे सं. सौभद्र, दि. १९ रोजी भार्गवी थिएटर्सतर्फे गोमंत संत सोहिरोबानाथ, दि. २० रोजी कला विकास रंगभूमी नाट्यसंस्था, गुहागरतर्फे सं. एकच प्याला, दि. २१ रोजी खल्वायनतर्फे प्रीती संगम, दि. २२ रोजी मन्वंतर कला मंडळ, मुंबईतर्फे सं. धन्य ते गायनी कला, दि. २३ रोजी दीपक मंडळ सांस्कृतिक विभाग ,नाशिकतर्फे सं. तुक्याची आवली, दि. २४ रोजी परस्पर सहाय्यक मंडळ (वाघांबे) मुंबईतर्फे लावणी भूलली अभंगाला, दि. २५ रोजी प्रमुख कामगार अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका सं. पंढरपूर, दि. २७ रोजी पै. फंडतर्फे सं. शारदा, दि. २८ रोजी राधाकृष्ण कला मंचतर्फे सं. स्वयंवर, २९ रोजी सहकारी मनोरंजन मंडळ, लि.तर्फे चंद्र लपला मेघावरी, दि. ३० रोजी सहयोग, रत्नागिरीतर्फे सं. मत्स्यगंधा, दि. ३१ रोजी संगीत विद्यालय, रत्नागिरीतर्फे सं. संशय कल्लोळ, दि. १ रोजी सांस्कृतिक कला मंच, नांदेडतर्फे सं. स्वयंवर, दि. २ रोजी श्री ज्ञानेश्वर कला संस्कृ ती क्रीडा मंडळ, सिंधुदुर्गतर्फे ययाती आणि देवयानी, दि. ३ रोजी विघ्नहर्ता सेवासंघ, मुंबईतर्फे लावणी भुलली अभंगाला, दि. ४ रोजी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलीत नाट्य विभाग, अहमदनगरतर्फे सं. स्वर्गहरण नाटक सादर करण्यात येणार आहे. रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र सांस्कृ तिक कार्य संचालनालयातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ratnagiri 54th State Amateur Music Theater Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.