रत्नागिरी- दीड लाखापेक्षा अधिक मूर्तींची प्रतिष्ठापना

By admin | Published: August 26, 2014 10:45 PM2014-08-26T22:45:58+5:302014-08-26T22:51:48+5:30

आले गणराय : घरोघरी आगमनाची जय्यत तयारी

Ratnagiri - Installation of idols more than one and a half lakhs | रत्नागिरी- दीड लाखापेक्षा अधिक मूर्तींची प्रतिष्ठापना

रत्नागिरी- दीड लाखापेक्षा अधिक मूर्तींची प्रतिष्ठापना

Next

रत्नागिरी : ‘वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ...’ अवघ्या भक्तांचे लाडके दैवत असणाऱ्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचे आगमन दोन दिवसांवर आले आहे. जिल्हाभरात १ लाख ५९ हजार ४३६ घरगुती, तर १०८ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानिमित्त घरोघरी बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
सुबक गणेशमूर्तींसोबत बैठकीची आरास सुंदर सजविली जाते. त्यासाठी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते. घरगुती गणेशोत्सवाबरोबर सार्वजनिक गणेशोत्सवात विद्युत रोषणाई करण्यात येते. दीड दिवसाच्या गणेशोत्सवाबरोबर पाच दिवसांचे, सात दिवसांचे, तर अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. एस. टी. व रेल्वे प्रशासनाकडून मुंबईकरांसाठी जादा गाड्या सोडण्यात येत आहेत. बाजारपेठदेखील नटली आहे. शाळा, महाविद्यालयांचा उद्या शेवटचा दिवस असून, २८ आॅगस्टपासून गणेशोत्सवाची सुटी लागणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ५६ हजार ९३० घरगुती, तर १०८ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहेत. रत्नागिरी शहरात ७६१० घरगुती, तर २७ सार्वजनिक, ग्रामीणमध्ये ९ हजार ४३२ घरगुती, तर २ सार्वजनिक, जयगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत २७०० घरगुती, तर ६ सार्वजनिक, राजापूरमध्ये १९ हजार ८८६ घरगुती तर ६ सार्वजनिक, नाटे येथे ७ हजार २६२ घरगुती, तर २ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
लांजा येथे १३ हजार ५४० खासगी तर ५ सार्वजनिक, देवरूखमध्ये १२ हजार १८० घरगुती व ५ सार्वजनिक, सावर्डेत १० हजार २४० घरगुती व १ सार्वजनिक, चिपळूणमध्ये १२ हजार ६५० घरगुती व १३ सार्वजनिक, गुहागरमध्ये १४ हजार २२४ घरगुती व २ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
अलोरेमध्ये ५ हजार ५७४ घरगुती व ४ सार्वजनिक, खेडमध्ये १२ हजार ८९७ घरगुती व १५ सार्वजनिक, दापोलीमध्ये ६ हजार १३९ घरगुती व ७ सार्वजनिक, मंडणगडात ४ हजार २७५ घरगुती व ६ सार्वजनिक, बाणकोटमध्ये १ हजार ८७४ घरगुती व २ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

१ लाख ५९ हजार ४३६ खासगी गणेशमूर्ती.
१०८ सार्वजनिक गणेश मूर्ती.
एस. टी. व रेल्वे प्रशासनाकडून मुंबईकरांसाठी जादा गाड्या.
शाळा, महाविद्यालयांना उद्यापासून मिळणार सुटी.
घरोघरी गणेशोत्सवाच्या आगमनाची चाहुल.

Web Title: Ratnagiri - Installation of idols more than one and a half lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.