मालवण आगारातून रत्नागिरी, कोल्हापूर बसफेऱ्या सुरू, जाणून घ्या एसटी बसचे वेळापत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 12:07 PM2022-01-12T12:07:15+5:302022-01-12T12:08:01+5:30

कुडाळ, कणकवली, देवगड, वेंगुर्ले या मार्गावरही बसफेऱ्या वाढविल्या असल्याची माहिती आगार प्रमुख सचेतन बोवलेकर यांनी दिली.

Ratnagiri, Kolhapur bus service starts from Malvan depot | मालवण आगारातून रत्नागिरी, कोल्हापूर बसफेऱ्या सुरू, जाणून घ्या एसटी बसचे वेळापत्रक

मालवण आगारातून रत्नागिरी, कोल्हापूर बसफेऱ्या सुरू, जाणून घ्या एसटी बसचे वेळापत्रक

googlenewsNext

मालवण : येथील एसटी आगारातून आजपासून मालवण रत्नागिरी व मालवण कोल्हापूर ही बसफेरी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान कुडाळ, कणकवली, देवगड, वेंगुर्ले या मार्गावरही बसफेऱ्या वाढविल्या असल्याची माहिती आगार प्रमुख सचेतन बोवलेकर यांनी दिली.

मालवण रत्नागिरी ही बसफेरी सकाळी साडे आठ वाजता तर कोल्हापूर बसफेरी दुपारी दोन वाजता सुटणार आहे. कुडाळ मार्गावर सकाळी ८, ९, ११, १२, २, ४, ५, ७. ४५ यावेळेत आठ फेऱ्या, कणकवली मार्गावर सकाळी ७, दुपारी ३.३० वाजता, कसाल मार्गावर दुपारी १ वाजता, देवगड मार्गावर सकाळी ७.४५ वाजता, दुपारी १ वाजता, वेंगुर्ले मार्गावर सकाळी ८ वाजता, दुपारी २ वाजता अशा बसफेऱ्या सोडण्यात आल्या आहेत.

सहा चालक, सहा वाहक सेवेत हजर झाले आहेत तसेच अन्य एक यासह मॅकेनिक, ऑफिस स्टाफ हजर झाले असल्याचे श्री. बोवलेकर यांनी स्पष्ट केले. 

शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ करत काही मागण्या मान्य केल्या आहेत. तरीही एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. मात्र, काही कर्मचारी कामावर हजर झाल्याने काही प्रमाणात एसटीची सेवा सुरु झाली आहे. शासनाकडून वेळोवेळी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याबाबत आवाहन केले जात आहे. 

Web Title: Ratnagiri, Kolhapur bus service starts from Malvan depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.