गुन्ह्यांची उकल करण्यात रत्नागिरी शेवटून दुसरा

By admin | Published: October 16, 2015 09:54 PM2015-10-16T21:54:48+5:302015-10-16T22:38:16+5:30

प्रशांत बुरडे : चोरीच्या टोळ्यांबाबतचे प्रकार फक्त अफवाच

Ratnagiri is the second to end the crime | गुन्ह्यांची उकल करण्यात रत्नागिरी शेवटून दुसरा

गुन्ह्यांची उकल करण्यात रत्नागिरी शेवटून दुसरा

Next

रत्नागिरी : कोकण परिक्षेत्रामध्ये सर्वाधिक गुन्ह्याचे प्रमाण पालघरमध्ये आहे. गुन्हे तपासणीचे ठाणे येथे ८६ टक्के, पालघर ६४ टक्के, रायगड ७४ टक्के, रत्नागिरी ६५ टक्के, तर सिंधुदूर्ग ८० टक्के प्रमाण आहे. त्यामुळे गुन्हे तपासणीमध्ये रत्नागिरी जिल्हा कोकण परिक्षेत्रात चौथ्या क्रमांकावर असल्याची माहिती कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील उपस्थित होते.
गेल्या दोन महिन्यात रत्नागिरी जिल्ह््यातील विविध गावागावात फासेपारधी टोळ्या आल्या असून, रात्री ग्रामस्थ जागता पहारा ठेवत असल्याबाबत विचारले असता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी अफवा असल्याचे सांगितले. घटनेचा तपास केला असता यात काही सत्य नसल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात फासेपारध्यांचा उपद्रव सुरू आहे. मात्र, कोकणात हा उपद्रव नसल्याचे पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांनी सांगितले.
सोशल मीडियावरून अशाप्रकारच्या अफवा पसरवण्यात येत असल्यामुळे देवरूख व रत्नागिरी शहरातील प्रत्येकी एकावर कारवाई करण्यात आली आहे. खूनाचा शोध घेणे सोपे असले तरी दरोडे, लूट याचा तपास लावणे तितकेच अवघड आहे. दहशत माजवणाऱ्यांवर पोलिसांकडून लवकरच ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बुरांडे यांनी दिली.
शहरातील वाहतुकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आराखडा पाठवण्यात आला आहे. आठवडा बाजार, महाविद्यालय परिसरातील प्रश्न मार्गी लागला आहे. हळूहळू शहरातील अन्य भागांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले. वाहतूक अपघातामध्ये जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक चालकांचा वाहतूक परवाना रद्द करण्याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सूचीत करण्यात आल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. तंटामुक्त अभियानाचा यावर्षीचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार असून, रखडलेल्या विजेत्यांचा सन्मान देखील लवकरच करण्यात येणार येईल. (प्रतिनिधी)


नियमांचे पालन : वाहतुकीच्या प्रश्नासाठी तीन महत्वाच्या बाबी
कोणताही शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवत असताना तीन महत्त्वांच्या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वाहन चालवण्याचे नियम, त्याची केली जाणारी अंमलबजावणी, नियमांची अंमलबजावणी केली जात आहे का, सिग्नल यंत्रणा कार्यक्षम आहे का? तसेच वाहतूक पोलीसदेखील कार्यरत असणे तितकेच आवश्यक आहे. याशिवाय सिग्नल यंत्रणेचे होणारे पालन अथवा तोडण्याची मानसिकता आणि त्यावर होणारी कारवाई याबाबतही लक्ष देणे गरजेचे आहे.

दोघांवर कारवाई
रत्नागिरी जिल्ह्यात फासेपारधी टोळ््या आल्याचे वृत्त पसरले आहे. या केवळ अफवा असल्याचे प्रशांत बुरडे यांनी सांगितले. सोशल मीडियावरून अशाप्रकारच्या अफवा पसरवणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Ratnagiri is the second to end the crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.