रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा उमेदवार भाजपचाच, बाळासाहेब भेगडेंनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 04:04 PM2022-11-11T16:04:55+5:302022-11-11T16:05:29+5:30

राज्यात बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युतीचे सरकार आहे. या मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असेल व कमळ चिन्हावरच तो उमेदवार लढेल

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha candidate of BJP, Balasaheb Bhegad gave the information | रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा उमेदवार भाजपचाच, बाळासाहेब भेगडेंनी दिली माहिती

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा उमेदवार भाजपचाच, बाळासाहेब भेगडेंनी दिली माहिती

googlenewsNext

ओरोस : लोकसभा उमेदवार  हे भाजप पक्षाचे  पार्लमेंटरी बोर्ड ठरवत असते. राज्यात बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युतीचे सरकार आहे. या मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असेल व कमळ चिन्हावरच तो उमेदवार लढेल अशी माहिती पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना लोकसभा प्रवास योजनेचे प्रभाग समन्वयक संजय ऊर्फ बाळासाहेब भेगडे यांनी सिंधूदुर्गनगरी येथील पत्रकार परिषदेत दिली.

लोकसभा प्रवास योजनेमध्ये  महाराष्ट्रातील अठरा लोकसभा मतदारसंघांची निवड झाली आहे. त्यात रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कामाला बळकटी देणे व सर्वसामान्य जनतेपर्यंत  पोहोचण्यासाठी बाळासाहेब भेगडे यांचा सिंधुदुर्ग-रत्नागिरी दौरा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गनगरी येथे प्रमुख भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक माध्यमिक पतपेढी सभागृहात झाली. तत्पूर्वी त्यानी जिल्हा मुख्यालयातील पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी समन्वय समितीचे साहाय्यक माजी आमदार प्रमोद जठार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजप नेते अतुल काळसेकर, भाजप सरचिटणीस  प्रभाकर सावंत,  संजू परब, महेश सारंग, धनंजय पात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यकर्ते, जनता यांच्याशी संवाद

भारतीय जनता पक्षाने राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना विविध योजनांच्या माध्यमातून सेवा दिली आहे. सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना राबविण्यात येतात या योजनांचा आढावा घेणे नागरिकांशी संवाद साधणे व भारतीय जनता पक्षाची संघटना मजबूत करणे या उद्देशाने लोकसभा प्रवास योजनेत देशभरातील १६० लोकसभा मतदारसंघांची निवड झाली आहे. यात महाराष्ट्रातील १८ लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून त्यामध्ये  रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवरच आपला हा जिल्हा दौरा असून  भाजप कार्यकर्ते जनता यांच्याशी संवाद साधणे  हा यामागील प्रमुख उद्देश आहे.

सर्वसामान्य जनतेसाठी चांगले काम करण्याचा प्रयत्न

केंद्रीय मंत्री  तसेच राज्य सरकार व केंद्र सरकार  याच्या माध्यमातून प्रत्येक भागात विविध विकासकामे व योजना राबविल्या जातात. सर्वसामान्य नागरिकांना याचा योग्य पध्दतीने लाभ मिळण्यासाठी संघटनात्मक पातळीवरही प्रयत्न होत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, भाजप नेते व केंद्रीय मंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा प्रवास योजनेची ही यात्रा सुरू असून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी चांगल्यात चांगले काम करण्याचा प्रयत्न आहे, असेही यावेळी बाळासाहेब भेगडे यांनी सांगितले.

Web Title: Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha candidate of BJP, Balasaheb Bhegad gave the information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.