रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात पहिल्या टप्यात ८.१७ टक्के मतदान, चिपळूणमध्ये सर्वाधिक मतदान
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 7, 2024 11:32 AM2024-05-07T11:32:50+5:302024-05-07T11:33:35+5:30
राणे, केसरकर, नाईक यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
सिंधुदुर्ग : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत संपूर्ण मतदारसंघात ८.१७% मतदान झाले आहे. या मतदारसंघात महायुतीतर्फे विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध विद्यमान उद्धव सेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यात लढत होत आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्नी नीलम राणे आणि सून प्रियांका राणे यांच्या सोबत मतदानाचा हक्क बजावला. आमदार नितेश राणे यांच्या पत्नी नंदिता राणे यांनी वरवडेत, आमदार वैभव नाईक यांनी सहकुटुंब कणकवलीत तर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सहकुटुंब सावंतवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला.
सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यात चिपळूण मध्ये सर्वाधिक १०.१३% रत्नागिरी मध्ये सहा टक्के राजापूर मध्ये १०.९.% कणकवली मध्ये ७ टक्के कुडाळमध्ये ७.९८% तर सावंतवाडीमध्ये ८.३९% मतदान झाले आहे.
दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदानाला सुरुवात झाली आहे. कडक उन्हाळा भासत असल्याने सकाळच्या सत्रात जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी सर्वच बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाने ही सर्वच मतदान केंद्रावर मतदारांसाठी वेगवेगळ्या सुख सुविधा केल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी कणकवली शहरातील काही मतदान केंद्रांची पाहणी देखील केली.