रत्नागिरीच्या सीमरनची राष्ट्रीयस्तरावरही ‘पॉवर’

By admin | Published: January 10, 2016 11:30 PM2016-01-10T23:30:26+5:302016-01-11T00:34:22+5:30

यश रत्नकन्यांचे --जिल्ह्याच्या लौकिकात भर टाकणाऱ्या रत्नकन्यांच्या यशाची मालिका

Ratnagiri's Cimmeran's national level 'Power' | रत्नागिरीच्या सीमरनची राष्ट्रीयस्तरावरही ‘पॉवर’

रत्नागिरीच्या सीमरनची राष्ट्रीयस्तरावरही ‘पॉवर’

Next

मेहरून नाकाडे - रत्नागिरी  -चॉकबॉल शिकत असतानाच डेडलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंगचा सराव सुरू केला. त्यानंतर स्पर्धेत सहभागी झाल्यापासून यश मिळत गेले. त्यामुळे हुरूप आला. आई - वडिलांचाही पाठिंबा मिळाल्यामुळे मी राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धांतून सहभागी होत विविध पारितोषिके मिळवली. भविष्यात खेळ सुरू ठेवून, आयपीएस अधिकारी बनण्याची इच्छा असल्याचे सीमरन शब्बीर आवटी हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सीमरन सध्या अभ्यंकर - कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे. इयत्ता नववीत असताना सीमरन चॉकबॉल स्पर्धेत सहभागी झाली होती. त्यानंतर मार्गदर्शक संजय झोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पॉवरलिफ्टिंग व डेडलिफ्टिंगचा सराव सुरू केला.
१७ ते २३ वयोगटात ४३ ते ४८ वजनी गटातील विविध स्पर्धांमध्ये सीमरन सहभागी झाली. प्रत्येक स्पर्धेत तिने यश मिळवले. पंजाब, तामिळनाडू, आग्रा, नागपूर, हरियाना, दिल्ली, कल्याण, मावळ, गोवेली, कल्याण, डोंबिवली, वाशिम, मुंबई, वेंगुर्ला, सातारा येथे झालेल्या स्पर्धेत ती सहभागी झाली.
सीमरनचे आई-बाबा दोघेही शासकीय नोकरीत कार्यरत आहेत. खेळाचे ज्ञान दोघांपैकी कोणालाही नाही. परंतु लेकीच्या आवडीला प्राधान्य देत तिला भक्कम पाठिंबा व भरपूर प्रोत्साहन दिले. त्यामुळे सीमरनचाही हुरूप वाढला आहे. भविष्यात खेळ सुरू ठेवण्याचा तिचा मानस आहे, शिवाय आयपीएस अधिकारी बनण्याची इच्छा पूर्ण करणार असल्याचे तिने सांगितले. कॉमनवेल्थ खेळण्याबरोबर महाराष्ट्र शासनाचा सर्वाेत्कृष्ट खेळाडूंसाठी देण्यात येणारा छत्रपती पुरस्कारही मिळवणार असल्याचे सीमरन हिने सांगितले.

राष्ट्रीय स्पर्धेत मिळविलेले यश
राष्ट्रीय सबज्युनिअर डेडलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक.
राष्ट्रीय सबज्युनिअर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कांस्यपदक.
नॅशनल बेंचप्रेस कांस्यपदक.
ज्युनिअर नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सहभाग.
नॅशनल ज्युनिअर बेंचप्रेस व डेडलिफ्ट स्पर्धेत सहभाग.
नॅशनल चॉकबॉल चॅम्पीयनशीप स्पर्धेत सहभाग.
राज्यस्तरीय स्पर्धेत मिळविलेले यश
सबज्युनिअर राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक.
सबज्युनिअर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक.
सबज्युनिअर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक.
सिनियर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक.
ज्युनिअर (महापौर) पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक.
सबज्युनिअर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक.
सबज्युनिअर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक.
सबज्युनिअर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सहभाग.
महाराष्ट्र राज्य युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत सहभाग.

Web Title: Ratnagiri's Cimmeran's national level 'Power'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.