जनतेच्या माथी महामार्ग टोल मारण्याचा राऊत यांचा प्रयत्न : परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 04:33 PM2020-11-09T16:33:31+5:302020-11-09T16:35:24+5:30

Parshuram Uprkar, highway, mns, sindudurg महामार्ग ठेकेदारांकडून टक्केवारी खाऊन झाल्यावर आता टोलमधून मलिदा मिळविण्यासाठी खासदार विनायक राऊत यांना महामार्गाचे लोकार्पण करण्याची घाई झाली आहे. अशी टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.

Raut's attempt to hit highway toll on people: Parashuram Uparkar | जनतेच्या माथी महामार्ग टोल मारण्याचा राऊत यांचा प्रयत्न : परशुराम उपरकर

जनतेच्या माथी महामार्ग टोल मारण्याचा राऊत यांचा प्रयत्न : परशुराम उपरकर

Next
ठळक मुद्देजनतेच्या माथी महामार्ग टोल मारण्याचा राऊत यांचा प्रयत्न : परशुराम उपरकर अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी जनहित याचिका

कणकवली : महामार्ग ठेकेदारांकडून टक्केवारी खाऊन झाल्यावर आता टोलमधून मलिदा मिळविण्यासाठी खासदार विनायक राऊत यांना महामार्गाचे लोकार्पण करण्याची घाई झाली आहे. अशी टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.

महामार्गाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे व या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपरकर म्हणाले, खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री आणि केंद्रीय वाहतूक मंत्री यांच्या उपस्थितीत महामार्गाचा लोकार्पण सोहळा केला जाईल अशी घोषणा केली. ही घोषणा हास्यास्पद आहे. येथील लोकांच्या अनेक समस्या आहेत. अद्यापही लोकांची नुकसान भरपाई मिळालेली नाही.
किंबहुना महामार्गासंबंधी प्रश्न सुटण्यासाठी खासदार राऊत यांनी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. मात्र, आपण लोकांसाठी काहीतरी करतोय हे दाखविण्यासाठी केवळ फोटोबाजी केली आहे.

या पट्ट्यातील महामार्गाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे व या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.

मात्र, अद्याप काम सुरू झालेले नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलमठ ते झाराप या पट्ट्यातील दोन मोठे उड्डाणपुलाचे भाग कोसळले. याबाबत नोटिसीद्वारे या संबंधित प्रशासन व अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर तपास अधिकाऱ्याने संबंधित कंत्राटदारांनी उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी निकृष्ट दर्जाचे सामान वापरल्याचे अहवालात म्हटले आहे. तरीही त्यांच्यावर काहीही कारवाई करण्यात आली नाही, अशी माहिती ॲड. तेजस धांडे यांनी न्यायालयाला दिल्याचे उपरकर यांनी यावेळी सांगितले.

काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते

न्यायालयाने याप्रकरणी राज्य सरकारसह सर्व कंत्राटदारांना नोटीस बजावत २६ नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. माजी आमदार परशुराम उपरकर यांनी ही याचिका ॲड. तेजस धांडे यांच्याद्वारे उच्च न्यायालयात दाखल केली आहे. बुधवारी या याचिकेवरील सुनावणी न्या. के. के. तातेड व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. याचिकेनुसार, मुंबई-गोवा महामार्ग कंत्राटदारांना दिलेल्या नोटिसानुसार महामार्गाचे रत्नागिरी ते सिंधुदुर्ग पट्ट्यातील चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. तसा करार २०१७ मध्ये कंत्राटदारांबरोबर करण्यात आला होता.

Web Title: Raut's attempt to hit highway toll on people: Parashuram Uparkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.