कट्टर राणे सर्मथक परब कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश, अन् जिल्हा बँक निवडणुकीत उमेदवारी देखील जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 07:43 PM2021-12-13T19:43:54+5:302021-12-13T19:47:01+5:30
जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यात मोठी राजकीय घडामोड घडली.
सावंतवाडी : जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यात मोठी राजकीय घडामोड घडली. तळवडे गावातील कट्टर राणे सर्मथक मानले जाणारे रविंद्र परब कुटूंबाने सोमवारी सायंकाळी आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. परब यांचे सुपुत्र विद्याधर परब यांना शिवसेनेकडून सावंतवाडी तालुका शेती संस्था गटातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी माजी जिल्हापरिषद सदस्या आनंदी परब, रविंद्र परब, जालिंदर परब, विष्णू परब, अभिजीत परब आदींनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.
जिल्हा बॅक निवडणुकीसाठी सावंतवाडी तालुका मतदार संघातून शेती संस्था या जागेसाठी तिघांची नावे आघाडीवर होती. यात बाबल ठाकूर, डि.बी.वारंग आणि विद्याधर परब यांचा समावेश होता. मात्र ऐनवेळी विद्याधर परब यांचे नाव आघाडीवर आले. मात्र त्यांनी भाजप कडून उमेदवारी मागितली होती. पण तेथे ही त्याचा पत्ताकट झाल्याने अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
आमदार दीपक केसरकर यांनी यावेळी परब कुटूंबियांना शुभेच्छा देत शिवबंधन बांधले. तसेच जिल्हा बॅक अध्यक्ष सतीश सावंत हे बाहेर गावी असल्याने सावंतवाडी तालुका शेती संस्था मतदारसंघातून विद्याधर परब याची उमेदवारी जाहीर करण्यात असल्याचे सागितले. यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, गुरू नाईक, नारायण हिराप, एकनाथ नारोजी, अशोक दळवी, अनिल जाधव, बाबल ठाकूर, डि.बी.वारंग, अनारोजीन लोबो उपस्थित होते.