मोर्चासाठी सिंधुदुर्गनगरी सज्ज

By admin | Published: October 21, 2016 01:09 AM2016-10-21T01:09:59+5:302016-10-21T01:09:59+5:30

तयारी अंतिम टप्प्यात : लाखोंचा जनसमुदाय एकवटणार,

Ready for the rally in Sindhudurg Nagar | मोर्चासाठी सिंधुदुर्गनगरी सज्ज

मोर्चासाठी सिंधुदुर्गनगरी सज्ज

Next


 सिंधुदुर्गनगरी सज्ज

गिरीष परब ल्ल सिंधुदुर्गनगरी

गेला महिनाभर सिंधुदुर्ग मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनासाठी सुरु असलेल्या प्रत्येक गाववार बैठका, त्यामुळे उफाळून आलेला मराठ्यांचा स्वाभिमान, मोर्चाला अन्य समाजातील बांधवांनी दिलेला सक्रीय पाठिंबा त्यामुळे २३ आॅक्टोबर रोजी सिंधुदुर्गातील होणारा मराठा क्रांती मोर्चा लक्षवेधी ठरणार आहे. सिंधुदुर्गच्या इतिहासात झालेल्या मोर्चांमध्ये रविवारी होणारा मराठा क्रांती मूक मोर्चा हा लाखोंच्या उपस्थितीने ‘न भूतो, न भविष्यती’ ठरणार आहे. मोर्चासाठी सिंधुदुर्गनगरी सज्ज झाली असून सिंधुदुर्गात फक्त मराठा मोर्चाची चर्चा जोरदार सुरु झाली आहे. मराठा बांधवांनी सिंधुदुर्गनगरीत इतिहास घडविण्यासाठी मोर्चात सहभागी होणार असल्याचा निर्धार केला आहे.

कोपर्डी येथील बलात्कार व हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, मराठ्यांना आरक्षण मिळावे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करण्यात यावा, यासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यभर मराठा क्रांती मूक मोर्चे निघत आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत.

सिंधुदुर्गातील मराठा क्रांती मोर्चाची २५ सप्टेंबर रोजी ओरोस येथील शरद कृषी भवन येथे नियोजित बैठक झाली होती. यामध्ये सर्वानुमते २३ आॅक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली. त्यानंतर प्रत्येक तालुका, विभागवार मराठा क्रांती कार्यालये थाटल्याने शहरांमध्ये, गावागावांमध्ये मोर्चाचे नियोजन, बैठका यामुळे मराठ्यांचा स्वाभिमान उफाळून आला आहे. तालुकावार असलेले संयोजक प्रत्येक गावागावात जाऊन मोर्चाविषयी आवश्यक सूचना, मोर्चात पाठविण्याची आचारसंहिता याबाबत मार्गदर्शन करत आहेत.

२३ रोजी होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाज सज्ज झाला आहे. दुचाकी, तीन चाकी, चार चाकी, सहा चाकी वाहनांवर छत्रपती शिवाजी महाराजांची छबी असलेले भगवे झेंडे लावून प्रत्येक तालुक्यामध्ये रॅली काढली जात आहे.

वाहनांच्या नंबर प्लेटवरही शिवाजी महाराजांची छबी व ‘एक मराठा, लाख मराठा’ असलेले घोषवाक्य लावले गेले आहेत. शहरांमध्ये, गावागावात भगवे झेंडे लावल्यामुळे जिल्ह्यात जणू भगवी लाटच पसरली असल्याचे वातावरण सध्या पहावयास मिळत आहे.

इतर समाजाचा पाठिंबा

मराठा क्रांती मोर्चाला सिंधुदुर्गातील विविध जाती बांधवांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. यामध्ये मुस्लीम समाज, भारतीय बौद्ध महासभा-सिंधुदुर्ग, कोष्टी समाज, सुतार समाज, ख्रिश्चन समाज, जैन समाज, गुरव समाज, क्षात्रकुलोत्पन्न समाज, वैश्य समाज आदींचा समावेश आहे. तर काही ग्रामपंचायतींनीही ठराव घेत पाठिंबा जाहीर केला आहे.

४२५ सप्टेंबरपासून अजूनपर्यंत व्हॉट्स अ‍ॅप या सोशल मीडियावर ‘मराठा क्रांती मोर्चा’चे कित्येक ग्रुप तयार झाले आहेत.

४प्रत्येक गावागावात मोर्चाबद्दलच्या अपडेटस् या ग्रुपमध्ये शेअर केल्या जात असल्यामुळे एक प्रकारचा उत्साह संचारला आहे.

४फेसबुकवरही मराठा क्रांतीचा ग्रुप स्थापन करुन मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसिद्धी केली जात आहे. याला मराठा बांधवांकडून भरभरुन प्रतिसाद दिला जात आहे.

४सिंधुदुर्गनगरीसाठी सध्या काही मीटर अंतरावर प्रत्येक ठिंकाणी ध्वनीक्षेपक बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच मोर्चासाठीच्या मुख्य स्टेजचे कामही सुरु झाले आहे.

सिंधुदुर्गनगरी झाली स्वच्छ

४मोर्चा ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी भवनावर धडकणार आहे. तेथील क्रीडा संकुल मैदानावर मोर्चा एकत्र होऊन काही ठराविक युवती भाषण करणार आहेत.

४या पार्श्वभूमीवर क्रीडा संकुल मैदान, अश्वारुढ शिवाजी महाराज पुतळा येथे साफसफाई करण्यात आली असून रंगरंगोटीचे कामही युद्धपातळीवर सुरु आहे. भगवे झेंडे सिंधुदुर्गनगरी येथे लावण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.

संयोजक मंडळी सर्वात शेवटी

४मोर्चात सहभागी होणाऱ्या बांधवांना एका विशेष रचनेत सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे. मोर्चामध्ये विद्यार्थी, युवती, महिला, डॉक्टर, वकील, पुरुष व त्यानंतर सर्वात शेवटी संयोजक नेते मंडळी अशाप्रकारे मोर्चाची रचना असणार आहे.

४ पोलिस प्रशासनाने सिंधुदुर्गनगरीत एका विशिष्ट ठिकाणी पार्किंग व्यवस्था केली आहे.

 

Web Title: Ready for the rally in Sindhudurg Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.