तिजोरीत खडखडाट घरपट्टी वसुलीही थांबली; नगरपालिकेच्या मालमत्ता विना निर्विदा देण्यावरून जोरदार खडांजगी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 11:43 PM2021-09-28T23:43:41+5:302021-09-28T23:45:09+5:30

सावंतवाडी नगरपालिकेची बैठक मंगळवारी येथील लोकमान्य टिळक सभागृहात नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

The real estate boom in the coffers also stopped; Strongly reluctant to give municipal property without tender | तिजोरीत खडखडाट घरपट्टी वसुलीही थांबली; नगरपालिकेच्या मालमत्ता विना निर्विदा देण्यावरून जोरदार खडांजगी

तिजोरीत खडखडाट घरपट्टी वसुलीही थांबली; नगरपालिकेच्या मालमत्ता विना निर्विदा देण्यावरून जोरदार खडांजगी

Next

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेत जे कर्मचारी भरण्यात आले आहेत. त्यामुळे नगरपालिकेच्या तिजोरीवर अर्थिक भार येत असून गरजेपेक्षा जास्त कंत्राटी कर्मचारी घेतलेच का? असा शिवसेनेच्या गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी केला तर शासनाने कोरोना काळात घरपट्टी वसुली करू नये, असे निर्देश दिल्याने दोन वर्षे घरपट्टी वसुली करण्यात आली नसल्यानेच नगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट असून येत्या एक काही दिवसात परस्थिती सुधारणार असल्याचा विश्वास नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला तर नगरपालिकेच्या वास्तू विना निर्विदा देण्यात येत असल्याच्या मुद्यावरून नगराध्यक्ष व शिवसेनेच्या गटनेत्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली.

सावंतवाडी नगरपालिकेची बैठक मंगळवारी येथील लोकमान्य टिळक सभागृहात नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुख्याधिकारी जंयत जावडेकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. सावंतवाडी नगरपालिकेत गेल्या दोन वर्षात गरज नसतना अनेक कंत्राटी कर्मचारी भरण्यात आल्याच्या मुद्दावरून नगरसेविका लोबो यांनी प्रशास नाला चांगलेच धारेवर धरले पालिकेची अर्थिक परस्थिती बघा आणि नंतर निर्णय घ्या गरज नसतना एवढे कर्मचारी का भरले?  नगरपालिकेकडे पैसे नाहीत पगार देण्यास मग हा बडेजाव कशासाठी? असा सवाल केला. यावर नगराध्यक्ष परब यांनी नगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. मात्र उद्या काही दिवसात जर आपण घरपट्टी वसुली केली तर १ कोटी ८२ लाख रूपये तिजोरीत येतील. त्यामुळे पगार देणे वैगरे सोपे होईल असे सांगितले.

बोट खरेदी वरूनही लोबो यांनी प्रशासनाला धारेवर धरले बोट घेतली चांगले झाले त्यांचे उद्घाटन ही झाले मग आता खर्चाला मंजुरी कशासाठी त्यात किती त्रुटी यांची पडताळणी केली का? आणि जर या विषयाला स्थायी समितीमध्ये मंजुरी दिली गेली तर मासिक बैठकीत हा विषय का आणला असा सवाल ही लोबो यांनी केला काझी शाबुद्दीन हॉल साठी एक अर्ज आला त्यावर विचार व्हावा, असा ठराव घेण्यात आला. मात्र यावरून लोबो यांनी पालिकेच्या मालमत्ता एका अर्जावर देणे योग्य नाही नगरपालिकेच्या पर्यटन सेंटर मधील एका रूमची चावी बंटी पुरोहित नामक व्यक्तीकडे कशासाठी तुम्ही रितसर प्रकिया करा आणि कोणतेही दुकान किंवा मालमत्ता द्या, अशी सूचना लोबो यांनी केली. यावरून नगराध्यक्ष परब यांनी शिवसेनेच्या काळात कुणा कुणाला मालमत्ता दिल्या त्यांची काय प्रकिया केली यांचा हिशेब माझ्याकडे आहे, असे सांगितले. तसेच व्यापारी संकुलातील गाळे पोट हिस्सेदार कसे काय नेमण्यात आले त्यांची चौकशी करू असे परब यांनी सांगितले. दरम्यान, या विषयावरून लोबो आणि नगराध्यक्ष परब यांच्यात जोरदार खडांजगी झाली.

नेत्याची नावे घेण्यावरून सत्ताधारी विरोधक आक्रमक
बैठकीत राज्यातील नेत्याची नावे घेण्यावरून शिवसेना भाजप चे नगरसेकवक चांगलेच आक्रमक झाले तुम्ही आमच्या नेत्याची नावे घेतलीच कशी असे म्हणत लोबो आक्रमक झाल्या त्याला नगरसेवक सुधीर आडिवरेकर,मनोज नाईक,आनंद नेवगी यांनी प्रत्युतर दिल हा विषय वाढत असल्याचे बघून नगराध्यक्ष परब यांनी त्यात हस्तक्षेप करत या पुढे सभागृहात राज्यातील तसेच केंद्रातील नेत्याची नावे घेतली जाऊ नये अशी सूचना केली.

Web Title: The real estate boom in the coffers also stopped; Strongly reluctant to give municipal property without tender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.