सिंधुदुर्गला १५९ कोटींचा निधी प्राप्त;प्रस्तावानुसार वर्ग
By admin | Published: May 4, 2017 09:58 PM2017-05-04T21:58:58+5:302017-05-04T21:58:58+5:30
हरिबा थोरात : जिल्हा वार्षिक नियोजन; यावर्षीही १०० टक्के निधी खर्चचा विश्वास
सिंधुदुर्गनगरी : सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक आराखड्यातील मंजूर १५९ कोटी ४३ लाख रुपये निधी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला आहे. विकासकामांच्या प्रस्तावांनुसार हा निधी वर्ग करणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात यांनी दिली.
मार्चअखेर आगामी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठीच्या १५९ कोटी ४३ लाख रुपये एवढ्या जिल्हा वार्षिक आराखड्यास शासनाने मंजुरी दिली होती. तत्पूर्वी सन २०१६-१७ या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजनाचा १३० कोटी निधी १०० टक्के खर्च करणे एक प्रकारचे आव्हान
होते. मार्चअखेरपर्यंत हा निधी केवळ ७० टक्के खर्च झाला होता, तर उर्वरित ३० टक्के एवढा निधी
शेवटच्या काही दिवसांत खर्च करणे अपेक्षित होते.
विविध विभागांनी दाखविलेली तत्परता यामुळे गतवर्षीचा १३० कोटी रुपये निधी १०० टक्के खर्च करण्यात जिल्हा प्रशासन
यशस्वी झाले होते. जिल्हा नियोजनाचा १०० टक्के निधी खर्च करणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. याची दखल घेत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात यांचे विशेष अभिनंदन केले होते. (प्रतिनिधी)
गतवर्षीप्रमाणे १००
टक्के निधी खर्च करणार
दरम्यान, सन २०१७-१८ या चालू वार्षिक आराखड्याचा १५९.४३ कोटी रुपये निधी नियोजन विभागाला प्राप्त झाला आहे. हा निधी विविध विभागांना विकासकामांसाठी वर्ग करण्यात येणार आहे. यावेळीही गतवर्षीप्रमाणे सर्वच्या सर्व १०० टक्के निधी खर्च करणार असल्याचा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.