'एलईडी'साठी तीन कोटी ५० लाखांचा निधी प्राप्त

By admin | Published: May 10, 2016 10:05 PM2016-05-10T22:05:56+5:302016-05-11T00:09:52+5:30

मालवण पालिका विशेष सभा : शहरात १ हजार ८६४ दिवे बसविण्यात येणार

Receives a fund of Rs. 3 crore 50 lakhs for 'LED' | 'एलईडी'साठी तीन कोटी ५० लाखांचा निधी प्राप्त

'एलईडी'साठी तीन कोटी ५० लाखांचा निधी प्राप्त

Next

मालवण : गेल्या कित्येक वर्षापासून मालवण शहराला स्ट्रीटलाईटची समस्या भेडसावत आहे. शहरातील स्ट्रीटलाईटचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा यासाठी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत शहरात एलईडी दिवे बसविण्यासाठी पालिकेला तीन कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यातील १ कोटी ३५ लाख रुपयाच्या प्रस्तावाला जिल्हा प्रशासनाकडून मान्यता देण्यात आली आहे, असे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उर्वरित २ कोटी १५ लाख रुपयांची कामे सुचविण्याबाबत पालिकेच्या विशेष सभेत चर्चा करण्यात आली. शहरात १ हजार ८६४ दिवे बसविण्यात येणार असून हे दिवे ४० वॅटचे असतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले. नगरसेवक नितीन वाळके यांनी स्थानिक ठेकेदाराला एलईडी बसविण्याचा ठेका देण्यात यावा. जेणेकडून दुरुस्ती करावयाची झाल्यास सोपे पडेल. तसेच एलईडी दर्जेदार निकषावर खरेदी केली जावी अशी सूचना केली. तर सुदेश आचरेकर यांनी एलईडीच्या देखभालीबाबत प्रशासनाने सुरक्षा, खबरदारी घ्यावी, असे सांगितले.
मालवण पालिकेची विशेष सभा मंगळवारी नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुख्याधिकारी अरविंद माळी, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, सुदेश आचरेकर, मंदार केणी, दीपक पाटकर, जॉन नऱ्होना, महेश जावकर, महेंद्र म्हाडगुत, नितीन वाळके, रविकिरण आपटे, स्नेहा आचरेकर, ममता वराडकर, संतोषी कांदळकर, महानंदा खानोलकर, दर्शना कासवकर, रेजिना डिसोजा, शीला गिरकर, पूजा करलकर, सेजल परब उपस्थित होते.
मालवण शहरातील रस्ते तसेच विविध विकासकामांच्या वाढीव खर्चाच्या मान्यतेवरून सभागृहात चांगलीच चर्चा रंगली. यावेळी महेंद्र म्हाडगुत यांनी वाढीव खर्चास थेट मान्यता देण्याबाबत आक्षेप घेत मंजुरी कोणत्या आधारावर द्यायची असा सवाल उपस्थित केला. यावर आचरेकर यांनी त्यांच्या मताला दुजोरा देत मंजुरीची आकडेवारी ढोबळ आहे. कामांचा वाढीव खर्च कशा पद्धतीने दाखविण्यात आला हे समजणे गरजेचे आहे, असे सांगताना शहरातील विकासकामे दर्जेदार झाली आहेत. मात्र वाढीव कामाच्या मंजुरीची पडताळणी झाली पाहिजे, अशी भूमिका मांडली. याला नगरसेवक महेंद्र म्हाडगुत व नितीन वाळके यांनी सहमती दर्शविली. भुयारी योजनेनंतर शहरात दर्जात्मक रस्ते झाले आहेत. मात्र काही ठिकाणी चेंबर लगतचे रस्ते खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा रस्त्यांवर डांबरीकरणाबाबत खर्चाची तरतूद करण्यात यावी, असे वाळके यांनी सुचित केले. तर रस्त्यांचे दर्जेदार डांबरीकरण झाल्याने आचरेकर यांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, सहकारी नगरसेवक व प्रशासनाचे अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Receives a fund of Rs. 3 crore 50 lakhs for 'LED'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.