सागरी महामार्गावरील कोळंब पूल दुरुस्तीची फेरनिविदा अखेर मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 01:05 PM2017-11-06T13:05:16+5:302017-11-06T13:26:00+5:30
सागरी महामार्गावरील कोळंब पूल दुरुस्तीसाठी तब्बल एका वर्षाने मुहूर्त मिळाला आहे. अवजड वाहतुकीसाठी पूर्णत: बंद ठेवण्यात आलेल्या पुलाच्या दुरुस्ती कामासाठी काढण्यात आलेली पहिल्या टप्प्यातील फेरनिविदा शासनाकडून मंजूर झाली असून ठेकेदारही दुरुस्ती कामासाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे कोळंब पूल दुरुस्तीच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश चव्हाण यांनी दिली.
मालवण ,दि. ०६ : सागरी महामार्गावरील कोळंब पूल दुरुस्तीसाठी तब्बल एका वर्षाने मुहूर्त मिळाला आहे. अवजड वाहतुकीसाठी पूर्णत: बंद ठेवण्यात आलेल्या पुलाच्या दुरुस्ती कामासाठी काढण्यात आलेली पहिल्या टप्प्यातील फेरनिविदा शासनाकडून मंजूर झाली असून ठेकेदारही दुरुस्ती कामासाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे कोळंब पूल दुरुस्तीच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश चव्हाण यांनी दिली.
कोळंब पुलाच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी रुपये खर्चाच्या रकमेची निविदा काढण्यात आली. मात्र एकाच ठेकेदाराने ही निविदा भरल्याने फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. दुरुस्तीत काही बदल सुचविण्यात आल्याने ३ कोटी ७५ लाख रुपये खर्चाची वाढीव निविदा दोन विभागात काढण्यात आली. यातील पहिला टप्पा म्हणजे निविदा भरणारा ठेकेदार दुरुस्तीसाठी पात्र ठरला आहे.
पहिल्या वेळी काढण्यात आलेल्या निविदेस एकाच ठेकेदाराने प्रतिसाद दिला. दुसऱ्यावेळी नव्याने निविदा काढण्यात आली. त्यावेळीही एकाच ठेकेदाराने निविदा भरली. मात्र पुलाच्या दुरुस्तीच्या जनभावना लक्षात घेता, पहिल्या टप्प्यास मंजुरी मिळाली आहे. दुसरा टप्पा मंजूर झाल्यास दुरुस्तीचे काम सुरु होऊन मे २०१८ पर्यंत पुलाची दुरुस्ती अपेक्षित आहे.