वेंगुर्ले तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद, सिंधुदुर्गात पावसाची संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 05:10 PM2019-07-18T17:10:49+5:302019-07-18T17:12:33+5:30

कणकवली तालुक्यातील देवघर मध्यम प्रकल्प ६२ टक्के भरला असून या धरणाच्या विमोचकातून सध्या ३४.७७ घनमीटर प्रति सेकंद विसर्ग सुरू आहे. सध्या या धरणात ६०.७७४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे.

Record of record rainfall in Vengurle taluka, Rainfall of rain in Sindhudurg | वेंगुर्ले तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद, सिंधुदुर्गात पावसाची संततधार

वेंगुर्ले तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद, सिंधुदुर्गात पावसाची संततधार

Next
ठळक मुद्देवेंगुर्ले तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद, सिंधुदुर्गात पावसाची संततधारदेवघर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू

सिंधुदुर्गनगरी : कणकवली तालुक्यातील देवघर मध्यम प्रकल्प ६२ टक्के भरला असून या धरणाच्या विमोचकातून सध्या ३४.७७ घनमीटर प्रति सेकंद विसर्ग सुरू आहे. सध्या या धरणात ६०.७७४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे.

या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात ८४.४० मिलीमीटर इतका पाऊस झाला असून १९४०.३० मिलीमीटर एकूण पाऊस झाला आहे. यावर्षी घळभरणी झालेल्या अरुणा प्रकल्पामध्ये ४०.८५ टक्के पाणीसाठा झाला असून या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत १४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत २०२०.२० मिलीमीटर एकूण पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासांत वेंगुर्ले तालुक्यात सर्वाधिक म्हणजे २२७.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

नाधवडे, सनमटेंब व तिथवली लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण भरण्याच्या मार्गावर असून नाधवडेत ९७.९२ टक्के, सनमटेंब - ९५.८२ टक्के आणि तिथवली - ८०.६२ टक्के आहे. ओझरम लघु पाटबंधारे प्रकल्पातून १८.५९ घनमीटर प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे. तिलारी आंतरराज्य प्रकल्प ७५.७८ टक्के भरला असून धरणात सध्या ३३९.००८० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात २७.४० मिलीमीटर पाऊस झाला असून १८९९.६० मिलीमीटर एकूण पाऊस झाला आहे.

सरासरी गतवर्षीपेक्षा ५७९ मिलीमीटरने घटली

१ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी १६०५ मिलीमीटर पाऊस झाला असून गेल्या वर्षी याच काळात जिल्ह्यात सरासरी २१८४.७८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ८७.२ मिलीमीटर सरासरी पाऊस झाला आहे.

तालुकानिहाय चोवीस तासात झालेला पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडे आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाचे आहेत. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग ८३ (१८०३), सावंतवाडी ४५ (१३५९), वेंगुर्ले २२७.६ (१८३७.०४), कुडाळ ८८ (१५९३), मालवण ४७ (१३१३), कणकवली ११४ (१८४४), देवगड १८ (१२५६), वैभववाडी ७५ (१८४३) असा पाऊस झाला आहे.

Web Title: Record of record rainfall in Vengurle taluka, Rainfall of rain in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.