इंटरनेट सेवा बंद झाल्यास परतावा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 04:09 PM2017-07-19T16:09:45+5:302017-07-19T16:09:45+5:30
सिंधुदुर्गातील ग्राहक संरक्षण बैठकीत मागणी
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी दि. १९ : भारत संचार निगम लिमिटेड मार्फत ग्राहकांना इंटरनेट सेवा दिली जाते. तथापि हा महिन्याचा प्लॉन असतो व महिन्यातील काही दिवस इंटरनेट सेवा मिळत नसते. तांत्रिक कारणास्तव बंद असते या बंद सेवेबाबत भारत संचार निगम लिमिटेड मार्फत परतावा किंवा बंद दिवसाप्रमाणे पुढील महिन्यात तेवढे दिवस सेवा देण्यात यावी. अशी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत करण्यात आली. जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची बैठक जुना डी.पी.डी.सी. हॉल मध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बैठकीत जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या सदस्यांनी या बैठकीत अशासकीय सदस्यांची यादी ही तालुकास्तरावरील तहसील कार्यालय व इतर कार्यालयाच्या दर्शनी भागात लावावी. जेणेकरुन सेवा घेण्या-या ग्राहकांची जर फसवणूक झाली तर त्यांना अशासकीय सदस्यांकडे तक्रार करता येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वारंवार वीज पुरवठा खंडीत होतो. तरी वीज पुरवठा सुरळीत चालु ठेवावा.
वीज वितरण कार्यालयांनी आपत्कालीन दुरध्वनी क्रमांक २४ तास सुरु ठेवावा. वीज देयकावर आपतकालीन यंत्रणाचा दुरध्वनी क्रमांक नमुद करावा. जिल्ह्यातील नोंदणी नसलेल्या अनधिकृत हॉटेल व्यावसायीकांवर कार्यवाही करावी. रस्त्याच्या बाजुला छोटे हॉटेल व्यवसायीक हे कर्मशिअल गॅस सिलेंडर न वापरता घरगुती सिलेंडर सरासपणे वापरताना दिसतात. याबाबत तपासणी करावी. स्वतंत्र पथक स्थापन करुन जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांना शोधून त्यांच्यावर कार्यवाही करावी.
प्रादेशिक परिवहन कार्यालयात दोनचाकी, चारचाकी वाहनाचा परवाना तसेच गाडी तपासणी इ. कामे करताना सर्व साधारण जनतेला त्रास सहन करावा लागतो. वेळेवर परवाने दिले जात नाही. जर परवानाचे कामे एजटांमार्फत केले तर वेळेवर होतात. प्रादेशिक परीवहन विभागाच्या आवारातील एजटांमार्फत चालविलेली कामे ही बंद करावी. परवाना संबंधी माहिती देण्यासाठी प्रादेशिक विभागानी एखाद्या संपर्क अधिकारी नेमावा. अशी मागण्या ग्राहक संरक्षण समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली.
या बैठकीस अशासकीय सदस्य सुभाष गोवेकर, नकुल पार्सेकर, विनायक पराडकर, एस. के. बांबुळकर, डॉ. राजेश नवांगुळकर, डॉ. मिलींद बोर्डवेकर, जगन्नाथ वळंजू, स्वप्नील नाईक, गुरुनाथ मडवळ, नंदकिशोर करावडे, नंदन मेघश्याम वेंगुर्लेकर उपस्थित होते.