पर्यटन पर्वा निमित्त आयोजित स्पर्धांमध्ये भाग नोंदवा : चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 05:57 PM2017-10-09T17:57:45+5:302017-10-09T17:58:22+5:30
पर्यटनाची वाढ व्हावी या उदेशाने देशभरात 5 ऑक्टोंबर ते 25 आक्टोंबर या कालावधीत पर्यटन पर्व 2017 हा उपक्रम राबविला जात आहे. या पर्यटन पर्वानिमित्त निबंध, वत्कृत्व व छायाचित्र स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत - जास्त युवक- युवती, विद्यार्थी तसेच हौशी छायाचित्रकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी येथे केले.
सिंधुदुर्गनगरी दि. 09 : पर्यटनाची वाढ व्हावी या उदेशाने देशभरात 5 ऑक्टोंबर ते 25 आक्टोंबर या कालावधीत पर्यटन पर्व 2017 हा उपक्रम राबविला जात आहे. या पर्यटन पर्वानिमित्त निबंध, वत्कृत्व व छायाचित्र स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत - जास्त युवक- युवती, विद्यार्थी तसेच हौशी छायाचित्रकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी येथे केले.
पर्यटन महामंडळाच्या कार्यालयात आयोजित पर्यटन पर्व शुभारंभ प्रसंगी दीप प्रज्वलन करुन या पर्वाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चौधरी बोलत होते.
यावेळी प्रकल्प अधिकारी दीपक माने, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, अतुल हुले तसेच पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक तसेच निवास न्याहारी योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी सिंधुदुर्गात पर्यटन क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या व्यक्तींचा जिल्हाधिकारी चौधरी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सर्वश्री. अतुल हुले, दिनानाथ बांदेकर, हेमंत ओगले, संतोष काकडे, प्रा. हरीभाऊ भिसे, चंद्रशेखर उपरकर, काका भिसे यांचा गौरव करण्यात आला.
प्रारंभी प्रकल्प अधिकारी दीपक माने यांनी पर्यटन पर्वा निमित्त आयोजित करण्यात येणा-या विविध स्पर्धांची माहिती देऊन पर्यटन पर्वाचा हेतू विशद केला.