खासदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, महाराष्ट्र स्वाभिमानची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 11:54 AM2019-02-27T11:54:24+5:302019-02-27T12:00:00+5:30
मोबाईल टॉवरबाबत दिशाभूल करून फसवणूक केल्या प्रकरणी असल्याप्रकरणी खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात ४२० चा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.याबाबत तातडीने कारवाई करा अशी मागणी ही या शिष्टमंडळाने दिलेल्या निवदेनात केली आहे.
सावंतवाडी: मोबाईल टॉवरबाबत दिशाभूल करून फसवणूक केल्या प्रकरणी असल्याप्रकरणी खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात ४२० चा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.याबाबत तातडीने कारवाई करा अशी मागणी ही या शिष्टमंडळाने दिलेल्या निवदेनात केली आहे.
यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब महिला तालुकाध्यक्षा गीता परब नगरसेवक सुधीर आडीवरेकर,माजी नगरसेवक गुरू मठकर, नगरसेवक राजू बेग, मोहिनी मडगावकर उपसभापती संदीप नेमळेकर, बांदा उपसरपंच अक्रम खान, विनायक ठाकूर,उपाध्यक्ष मिथिलेश सुकी,युवक शहरअध्यक्ष मनोज नाटेकर,केतन आजगावकर,शैलेश तावडे, ज्ञानेश्वर सावंत, संजय नाईक,अमित गवंडळकर राजू परब आदी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र स्वाभिमानच्या वतीने आम्ही दिलेल्या निवेदनाची लवकरात लवकर चौकशी करा कारण सर्वात मोठ्याभारत संचार निगम लिमिटेड कडे टॉवर उभारणीसाठी निधी नसताना दुरसंचार विभागाचे स्थानिक अध्यक्ष स्थानिक खासदार विनायक राऊत हे कसे काय उद्घाटने करतात हे चुकीचे आहे.त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे.याबाबत आम्हाला आमदार नितेश राणे यांनी आदेश दिले आहेत.