वॉटर स्पोर्ट्स सुरू झाल्याने कोकणातील व्यावसायिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 06:18 PM2020-12-24T18:18:17+5:302020-12-24T18:20:03+5:30

fort boating sindhudurg- कोरोनाचा संसर्ग उद्भवल्यानंतर बंद पडलेले वॉटर स्पोर्ट्स व नौकानयनाला परवानगी मिळाल्यामुळे कोकणातील व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. या संदर्भात भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्य सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

Relief for Konkan traders with the launch of water sports | वॉटर स्पोर्ट्स सुरू झाल्याने कोकणातील व्यावसायिकांना दिलासा

वॉटर स्पोर्ट्स सुरू झाल्याने कोकणातील व्यावसायिकांना दिलासा

googlenewsNext
ठळक मुद्दे वॉटर स्पोर्ट्स सुरू झाल्याने कोकणातील व्यावसायिकांना दिलासा आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांना यश

सिंधुदुर्ग: कोरोनाचा संसर्ग उद्भवल्यानंतर बंद पडलेले वॉटर स्पोर्ट्स व नौकानयनाला परवानगी मिळाल्यामुळे कोकणातील व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. या संदर्भात भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्य सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

कोकणातील पर्यटनाला ैकोरोना'मुळे जबरदस्त फटका बसला. उन्हाळ्याच्या सुटीत मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र, उन्हाळी हंगाम वाया गेला. पावसाळी पर्यटनावरही मर्यादा आल्या. दिवाळीत निर्बंध शिथिल झाल्यावर काही अंशी लगबग सुरू झाली. मात्र, राज्य सरकारने अन्यायकारक पद्धतीने वॉटर स्पोर्टस् वर बंदी घातली होती.

या बंदीमुळे वॉटरस्पोर्ट्स वर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांचे नुकसान होत होते. कोकणातील अनेक कुटूंबांचा रोजगारच बंद झाला होता. या बाबत सातत्याने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

या प्रश्नावर राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे लक्ष वेधून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पाठविण्यात आले होते. अखेर या संदर्भात राज्य सरकारने शासन निर्णयाद्वारे वॉटर स्पोर्ट्स व नौकानयनाला परवानगी दिली. त्यामुळे कोकणातील व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Relief for Konkan traders with the launch of water sports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.