आरामबस झाडावर आदळून २९ जखमी

By admin | Published: December 20, 2015 12:42 AM2015-12-20T00:42:02+5:302015-12-20T00:42:02+5:30

सहा गंभीर : चिपळुणातील आगवेनजीक घटना

Relieve bus fell 29 trees and injured 29 | आरामबस झाडावर आदळून २९ जखमी

आरामबस झाडावर आदळून २९ जखमी

Next

सावर्डे : मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी पहाटे साडेचार वाजता आगवेनजीक धोकादायक वळणावर रानटी डुकरांच्या कळपाला वाचविण्यासाठी चालकाने ब्रेक दाबला. मात्र, त्याचवेळी त्याचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी झाडावर जोरदार आदळली. या अपघातात २९ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील सहाजणांची प्रकृती चिंताजनक आहे. चिपळूण तालुक्यातील आगवेनजीक हा अपघात झाला.
मुंबई येथील नाईक ट्रॅव्हल्स कंपनीची व्होल्व्हो आरामबस (एमएच-०७-एफ-८८००) गोव्याच्या दिशेने प्रवासी वाहतूक करीत होती. बोरीवलीहून ही गाडी रात्री नऊला सुटली होती. चालक अमित नारायण मेस्त्री (वय २७, कुडाळ) हा गाडी चालवीत होता. चिपळूण तालुक्यातील आगवेनजीक गाडी आली असता दाट धुके असल्याने व या वळणावर अचानक डुकरांचा कळप रस्त्यावर आल्याने त्यांना वाचविण्यासाठी ब्रेक दाबल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे बस रस्त्याच्या डाव्या बाजूला सरकून झाडावर जोरदार आदळली. पहाटेची वेळ असल्याने सर्व प्रवासी गाढ झोपेत होते. अचानक मोठा आवाज झाला. यामध्ये अनेकांचे हात-पाय व कंबर यांना दुखापत झाली. घटनास्थळी पोलीस कर्मचारी, ग्रामस्थ दाखल झाल्याने जखमींना बसमधून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून डेरवण वालावलकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये २८ प्रवासी व चालकाचा समावेश आहे.
सर्व प्रवासी ख्रिसमस सणानिमित्त ग्रुपने सहलीसाठी गोव्याकडे निघाले होते. सुदैवाने येथील बीएसएनएल कंपनीने खणलेल्या खड्ड्यात बस पडली नाही. तसे झाले असते तर बस उलटली असती आणि मोठी दुर्घटना घडली असती. अपघातातील सहा प्रवासी अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. यामध्ये आदित्य चंद्रशेखर (२७), सौम्या हरिदास (२७), सूरज सांतरम (२७), नारायण गुजर (३३), मुनपेली ज्योती (३२), मनोजकुमार जयस्वाल (२८) यांचा समावेश आहे.
सुषमा गणपत पुजारे (२८), गायत्री संतोष राणे (३९), अश्विनी विक्रम धनावडे (२८), ममताव अनिलकुमार गोल (२३), दीपाली सचिन पवार (३०), तेजस राजगोपाल (२५), अमित विष्णू मेस्त्री (२६), रितेश सुरेंद्रकुमार झा (३०), मैजुबुन रेहमान (३७), बेनझीद सुरय्या (२९), झैनाब रेहमान (१२), अनुज जयस्वाल (३२), आन्या रायजादा (७), प्रियांका श्रीवास्तव जयस्वाल (३२), अनशू श्रीवास्तव (२८), वत्सला कर्नम (२३), सोमनाथ भट्टाचार्य (२६), शीतल प्रजेश (३०), प्रजेश कालिदास (३०), अमिषा बुझ (२३), सलोन जॉन (३०), स्नेहलता प्रेमनाथ बटाले (५१), स्वाती सानाप (२६) हे किरकोळ जखमी झाले आहेत. (वार्ताहर)
 

Web Title: Relieve bus fell 29 trees and injured 29

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.