दफन केलेले मृतदेह बाहेर काढण्याबाबत श्रमविहार कॉलनीतील रहिवाशांचे तहसिलदांरांना साकडे

By admin | Published: April 15, 2017 02:18 PM2017-04-15T14:18:18+5:302017-04-15T14:18:18+5:30

शांतता समितीची तातडीची बैठक

To remove dead bodies, the residents of Shramwihhar Colony | दफन केलेले मृतदेह बाहेर काढण्याबाबत श्रमविहार कॉलनीतील रहिवाशांचे तहसिलदांरांना साकडे

दफन केलेले मृतदेह बाहेर काढण्याबाबत श्रमविहार कॉलनीतील रहिवाशांचे तहसिलदांरांना साकडे

Next


आॅनलाईन लोकमत

सावंतवाडी, दि. १५ : श्रमविहार कॉलनी लगत दफन केलेले मृतदेह बाहेर काढण्यासंदर्भात श्रमविहार कॉलनीतील रहिवाशांनी शनिवारी सकाळी तहसीलदार शशिकांत जाधव यांना साकडे घातले. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, नगरसेवक आनंद नेवगी उपस्थित होते.

यासंदर्भात बिशप आॅलविन बेलेटो यांच्याशी पालकमंत्री दीपक केसरकर व नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची सकारात्मक चर्चा झाली आहे. तशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.

दफन केलेल्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी प्रभारी प्रांताधिकारी सूर्यवंशी यांनी शांतता समितीची तातडीची बैठक बोलाविली आहे.

या शिष्टमंडळात विष्णु केसरकर, कीर्ति बोंद्रे, भरत पाटील, धनंजय बांदेकर, अनंत ओटवणेकर, सुप्रिया केसरकर, गीता सावंत, अजित सांगेलकर, राजू कासकर आदी सहभागी झाले होते.

Web Title: To remove dead bodies, the residents of Shramwihhar Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.