शिवसेनेकडून बेरोजगारांची थट्टाच: राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 10:44 PM2019-03-03T22:44:32+5:302019-03-03T22:44:37+5:30

कणकवली : शिवसेनेने कणकवलीत आयोजित केलेला रोजगार मेळावा खासदार विनायक राऊत यांनी अचानक रद्द करून जिल्ह्यातील तरुणांची एकप्रकारे थट्टाच ...

Rena is unemployed for Shiv Sena: | शिवसेनेकडून बेरोजगारांची थट्टाच: राणे

शिवसेनेकडून बेरोजगारांची थट्टाच: राणे

Next

कणकवली : शिवसेनेने कणकवलीत आयोजित केलेला रोजगार मेळावा खासदार विनायक राऊत यांनी अचानक रद्द करून जिल्ह्यातील तरुणांची एकप्रकारे थट्टाच केली आहे. यानिमित्ताने शिवसेनेने बेरोजगारांची फसवणूक केली आहे. शिवसेनेच्या या फसव्या वृत्तीचा आम्ही निषेध करतो, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वाभिमान पक्षाचे कणकवली तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, युवक स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, महेश लाड, कलमठ सरपंच देविका गुरव, जितेंद्र कांबळी, ग्रामपंचायत सदस्या हेलन कांबळी, संजीवनी पवार आदी उपस्थित होते.
यावेळी नितेश राणे पुढे म्हणाले की, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी सकाळी प्रसिद्धी माध्यमांसमोर रोजगार मेळाव्याची घोषणा केली होती. तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी रोजगार मेळाव्याच्या मंडप उभारणीचा नारळही फोडला होता. पण या मेळाव्यात येण्यास कंपन्यांनी नकार दिल्यामुळे हा रोजगार मेळावा रद्द करण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढवल्याचे ते म्हणाले.
एकीकडे शिवसेनेचे पदाधिकारी रोजगार मेळावा जाहीर करतात तर दुसरीकडे रद्द झालेल्या या मेळाव्याबद्दल बेरोजगारांची साधी दिलगिरीही व्यक्त करीत नाहीत, याला काय म्हणावे? असा प्रश्न आमदार राणे यांनी यावेळी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, खासदार राऊत यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांना सत्तेचा माज आला आहे. काहीही केले तरी आम्हालाच मते मिळणार, अशा गुर्मीत शिवसेनावाले आहेत. ते जनतेला गृहीत धरीत आहेत. राज्याचे उद्योगमंत्री शिवसेनेचे असतानाही त्यांना रोजगार मेळावा रद्द करावा लागतो ही नामुष्की आहे. यातूनच खासदार राऊत यांची पात्रता जिल्हा वासीयांना दिसून आली आहे. राणे कुटुंबीयांवर फक्त टीका करून ‘मातोश्री’च्या कृपेने आपली खासदारकी टिकवायची एवढेच काम ते करीत आहेत.
मागील ५ वर्षांत विनायक राऊत यांनी रोजगाराभिमुख एकही प्रकल्प सिंधुदुर्गात आणलेला नाही. तसेच एखादा कारखाना किंवा प्रस्तावित असलेली दोडामार्ग आडाळी येथील एमआयडीसीही ते आणू शकलेले नाहीत.
सिंधुदुर्गात शिवसेनेचे पालकमंत्री, खासदार, आमदार असताना आणि त्यांना सत्ता देऊनही सिंधुदुर्गवासीयांना नेमके काय मिळाले? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो. तसेच मागे झालेल्या डंपर आंदोलनात कर्जात बुडालेल्या डंपर मालकांनाही शिवसेनेने वाºयावर सोडले होते. त्यांना शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने संरक्षण दिलेले नाही, असे राणे म्हणाले.

Web Title: Rena is unemployed for Shiv Sena:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.