न्याय मिळण्यासाठी दूरसंचार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:16 AM2019-03-12T11:16:09+5:302019-03-12T11:18:29+5:30
भारत संचार निगम लिमिटेडच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेले नऊ महिने पगार न दिल्यामुळे त्यांच्यावर अन्नांन दशा झाली आहे. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून दयावा अशी मागणी आज बीएसएनएल च्या जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे केली आहे.
ओरोस : भारत संचार निगम लिमिटेडच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेले नऊ महिने पगार न दिल्यामुळे त्यांच्यावर अन्नांन दशा झाली आहे. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून दयावा अशी मागणी आज बीएसएनएल च्या जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे केली आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या कंत्राटी कामगारांना गेले नऊ महिने पगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना घर चालवणे कठीण झाले आहे. अनेकांच्या घरातील दाग दागिने विकून प्रपंच सुरू ठेवावा लागला आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचाही खेलखंडोबा झाला आहे.
शासनाने नियुक्त केलेला ठेकेदार या कामगारांना पगार तर दूरच उलट त्यांना कामावरून कमी करण्याची धमकी देत आहे. तसेच कामगारांमध्ये 70 टक्के कपात करण्याची तयारीही सुरू केली आहे.
गेली वीस वीस वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे आता वय सुद्धा वाढल्यामुळे त्यांना इतर कुठेही नोकरी मिळण्याची संधी निघून गेली आहे. या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा व त्यांचे थकीत वेतन मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.