वैद्यकीय महाविद्यालय उभारणीस जनमताची जोड, प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 11:47 AM2019-01-25T11:47:27+5:302019-01-25T11:52:45+5:30
जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सुटावा यासाठी झाराप ते बांदा दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या मागणीला आता जनमताची जोड मिळाली आहे. तब्बल १३० स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागण्यांचे ठराव गुरूवारी कृती समितीने मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी येथील प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना सुपूर्त केले.
सावंतवाडी : जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सुटावा यासाठी झाराप ते बांदा दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या मागणीला आता जनमताची जोड मिळाली आहे. तब्बल १३० स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागण्यांचे ठराव गुरूवारी कृती समितीने मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी येथील प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना सुपूर्त केले.
जिल्ह्यात आरोग्यसुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळे गंभीर रूग्णांवर उपचारासाठी गोवा किंवा कोल्हापूरवर अवलंबून रहावे लागते. येथे रूग्णालय आहेत पण त्यात डॉक्टर किंवा सक्षम सुविधा नसल्याने उपचार होऊ शकत नाहीत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास येथे सुसज्ज रूग्णालयाबराबेरच तज्ञ, डॉक्टर व इतर सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
यासाठी कृती समिती स्थापन झाली. त्यांनी सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग आणि माणगाव खोरे (कुडाळ) या कार्यक्षेत्रात जनजागृती केली. त्यांनी गावोगाव बैठका घेऊन जनजागृती सुरू केली. या संकल्पनेला लोकांचे उत्स्फूर्त पाठबळ मिळू लागले. याचा परिणाम म्हणून तब्बल १३० स्थानिक स्वराज्य संस्थांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एकमुखी ठराव घेतला. सावंतवाडी पालिकेने सगळ्यात आधी ठराव घेत याची सुरूवात करून दिली. हे सर्व ठराव गुरूवारी मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी प्रांताधिकारी खांडेकर यांच्याकडे देण्यात आले.