मालवण ग्रामीण रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 05:45 PM2017-10-09T17:45:05+5:302017-10-09T17:46:04+5:30
मालवण येथील ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात सुविधांचा अभाव असल्याने मृतांच्या नातेवाईकांनाच मृतदेहासाठी लागणारे साहित्य खरेदी करावे लागत आहे. तसेच शवविच्छेदनगृह परिसरातही झाडी वाढली असून रुग्णालय प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाचा हेळसांडपणाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
मालवण,9 : येथील ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात सुविधांचा अभाव असल्याने मृतांच्या नातेवाईकांनाच मृतदेहासाठी लागणारे साहित्य खरेदी करावे लागत आहे. तसेच शवविच्छेदनगृह परिसरातही झाडी वाढली असून रुग्णालय प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाचा हेळसांडपणाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
आधी दीपक वाघमारे अपघाती मृत्यू प्रकरणात तर आता मसुरे डांगमोडे येथे नव दांपत्याने केलेली आत्महत्या या प्रकरणात हे प्रकर्षाने जाणवले. रुग्णालय प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे मृतांच्या नातेवाईकांची हेळसांड होण्याचे प्रकार वाढल्याने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त होत आहे.
मसुरे-डांगमोडे येथील संतोष गंगाराम ठाकूर व सानवी ठाकूर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांचे मृतदेह विच्छेदनासाठी शनिवारी ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात आणण्यात आले. त्याची माहिती येथील पोलिसांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांना दिली होती. यावर डॉ. पाटील यांनी ही घटना मसुरे येथील असल्याने तेथील वैद्यकीय अधिकाºयांना शवविच्छेदनासाठी बोलविण्याचे सांगितले.
गोळवणचे वैद्यकीय अधिकारी रविवारी सकाळी साडेदहा वाजता ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी दाखल झाले. मात्र डॉ. पाटील यांनी आपण आल्यावरच शवविच्छेदन करावे असे सांगितल्याने गोळवणचे वैद्यकीय अधिकारी थांबले होते.
रविवारी ११.३० वाजता शवविच्छेदनास सुरुवात झाली. यात शवविच्छेदन करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य मृतांच्या नातेवाईकांनाच बाजारातून आणण्यास सांगण्यात आले. डॉ. पाटील हे मृतदेह पाहून त्याठिकाणी गोळवणच्या वैद्यकीय अधिकाºयांना सूचना देत निघून गेले.
ग्रामीण रुग्णालयात कोणतेही साहित्य उपलब्ध नसल्याने नातेवाईकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. शहरात वारंवार होणाºया खंडित वीज पुरवठ्यामुळे विच्छेदन करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. महिलेच्या मृतदेहाचे विच्छेदन करताना महिला डॉक्टर उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असताना महिला पोलिस कर्मचाºयांचे सहकार्य घेण्यात आले.
शवविच्छेदनगृहाच्या परिसरात अस्वच्छता
ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहाच्या परिसरात प्रचंड झाडी वाढली आहे. तसेच परिसरात नागरिकांनी कचरा टाकल्यामुळे अस्वच्छता पसरली आहे. याठिकाणी मृताचे नातेवाईक तसेच पोलिसांना थांबण्यासाठी अगर पोलिसांना पंचनामा करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. अस्वच्छतेमुळे डासांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून स्वच्छता ठेवण्याबाबत कोणतेही नियोजन नसल्याने मसुरेतील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.