‘आप’च्या 3क्क् कार्यकत्र्याचे राजीनामे!
By admin | Published: August 31, 2014 12:28 AM2014-08-31T00:28:20+5:302014-08-31T00:29:09+5:30
मयांक गांधी यांच्या हुकूमशाहीला कंटाळून मुंबई, ठाणो आणि रायगड जिल्ह्यांतील तब्बल 3क्क्हून अधिक कार्यकत्र्यानी ‘आप’ला रामराम ठोकला आहे.
Next
>मयांक गांधींवर हुकूमशाहीचा आरोप : तीन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार
मुंबई : विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर येऊन ठेपल्या असतानाच आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मयांक गांधी यांच्या हुकूमशाहीला कंटाळून मुंबई, ठाणो आणि रायगड जिल्ह्यांतील तब्बल 3क्क्हून अधिक कार्यकत्र्यानी ‘आप’ला रामराम ठोकला आहे.
मोहम्मद लुकमान सिद्दीकी नदवी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकत्र्यानी पक्षाचा सामूहिक राजीनामा दिला असून, पुढील तीन दिवसांत आपण आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे नदवी यांनी पत्रकारांना सांगितले.
नदवी यांच्या म्हणण्यानुसार, आम आदमी पक्षातील चलबिचल वाढली असून, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मयांक गांधी यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून सुमारे तीनशेहून अधिक कार्यकत्र्यानी सामूहिक राजीनामा दिला आहे. मयांक यांच्याकडून कार्यकत्र्यामध्ये दुजाभाव केला जात होता. त्यामुळे कार्यकत्र्यामध्ये प्रचंड नाराजी होती. पक्ष विचारधारेपासून भरकटला आहे. ज्या स्वराज्यासाठी पक्षाने राष्ट्रीय स्तरावर आंदोलने छेडली, उपोषणो केली, तेच स्वराज्य पक्षात लागू करण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. मयांक गांधी यांनी पक्षाच्या विचारधारेला केराची टोपली दाखविली असून, त्यांच्या समर्थकांनी पक्षातील कार्यकत्र्याचे खच्चीकरण केले आहे. पक्षातील मराठी, दलित आणि अल्पसंख्याक कार्यकत्र्याना दुर्लक्षित करण्यात आले आहे. मयांक हे कार्यकत्र्यानाच आपली व्होटबँक समजत आहेत. मयांक यांच्या कार्यशैलीबद्दल आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याकडेही तक्रार केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे नदवी यांचे म्हणणो आहे. (प्रतिनिधी)