महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 03:41 PM2019-10-04T15:41:38+5:302019-10-04T15:57:40+5:30
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद विभागातील विभागीय अध्यक्ष ते बुथप्रमुखपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांच्याकडे दिले आहेत.
कणकवली : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद विभागातील विभागीय अध्यक्ष ते बुथप्रमुखपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांच्याकडे दिले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी घेतलेल्या भूमिकेनुसार हे राजीनामे देण्यात आले आहेत, अशी माहिती विभागीय अध्यक्ष आनंद ठाकूर यांनी दिली.
सतीश सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आपण महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. सावंत यांनी सलग तीनवेळा हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघामध्ये आहे.
तसेच या विभागातील कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ त्यांच्यामागे आहे. त्यामुळे सावंत यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर या विभागातील पदाधिकाऱ्यांनी सामूहिकरित्या आपले राजीनामे तालुकाध्यक्षांकडे सुपुर्द केले आहेत.