राष्ट्रवादी पक्षात राजीनामा सत्र सुरू, जिल्हाध्यक्षांची उचलबांगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 01:24 PM2019-07-29T13:24:10+5:302019-07-29T13:25:13+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांच्या उचलबांगडीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ तालुका राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजीनामा देणार असल्याची माहिती कुडाळ तालुकाध्यक्ष तथा जिल्हा सरचिटणीस भास्कर परब यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिली आहे. माजी मंत्री प्रवीण भोसले व सावंतवाडीच्या निरीक्षक अर्चना घारे यांच्यामुळे जिल्हा संघटनेत फूट पडत असल्याचा आरोपही त्यांनी या केला आहे.

Resignation session started in NCP, dissolving district president | राष्ट्रवादी पक्षात राजीनामा सत्र सुरू, जिल्हाध्यक्षांची उचलबांगडी

राष्ट्रवादी पक्षात राजीनामा सत्र सुरू, जिल्हाध्यक्षांची उचलबांगडी

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादी पक्षात राजीनामा सत्र सुरू, जिल्हाध्यक्षांची उचलबांगडीभोसले-घारे यांच्यामुळे संघटनेत फूट : भास्कर परब

कुडाळ : राष्ट्रवादी काँग्रेसचेसिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांच्या उचलबांगडीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ तालुका राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजीनामा देणार असल्याची माहिती कुडाळ तालुकाध्यक्ष तथा जिल्हा सरचिटणीस भास्कर परब यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिली आहे. माजी मंत्री प्रवीण भोसले व सावंतवाडीच्या निरीक्षक अर्चना घारे यांच्यामुळे जिल्हा संघटनेत फूट पडत असल्याचा आरोपही त्यांनी या केला आहे.

या पत्रकात परब यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गवस यांना प्रदेश राष्ट्रवादीने तडकाफडकी काढून टाकताना जिल्हा कार्यकारिणी किंवा अन्य जबाबदार पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. पक्षाने सुरू केलेल्या या हुकूमशाहीविरोधात जिल्हा राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकारिणीने पदत्याग करून तसे राजीनामापत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, निरीक्षक विलास माने यांच्याकडे सोपविले आहे. आता जिल्ह्यातील उर्वरित ६०० बुथप्रमुख आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.

पुण्याहून आलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षक अर्चना घारे यांच्या माध्यमातून या जिल्ह्यातील संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भास्कर परब यांनी या पत्रकातून केला आहे. त्यांना सावंतवाडीचे माजी मंत्री प्रवीण भोसलेही सहकार्य करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रवीण भोसले व अर्चना घारे यांच्यामुळे जिल्हा संघटनेत प्रचंड खळबळ माजून त्याची परिणिती जिल्हा कार्यकारिणीच्या राजीनाम्यात झाली आहे. सर्व जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे पाठविले आणि वरिष्ठांचे लक्ष वेधल्याचे त्यांनी यात म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री भास्कर जाधव हे चार दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जिल्हा दौºयावर आले होते. त्यावेळी त्यांनी येथील प्रत्येक मतदार संघात बैठका घेतल्या होत्या. त्यांच्या दौºयानंतर दोनच दिवसांत जिल्हाध्यक्षांची उचलबांगडी करण्यात आली असून, आता पुढील काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

राजकीय चर्चा; पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष

पुढील संघटनात्मक निर्णय येत्या आठ दिवसांत संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकारिणी बैठकीत घेऊन ठरविण्यात येईल, असेही या पत्रकात म्हटले आहे. मात्र नेमके किती जणांनी राजीनामे दिले याचा उल्लेख परब यांनी पत्रकात केला नसल्याने पक्षावर दबाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Web Title: Resignation session started in NCP, dissolving district president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.