बांदावासीयांचा इको सेन्सिटिव्ह झोनला विरोध

By admin | Published: February 20, 2015 10:26 PM2015-02-20T22:26:16+5:302015-02-20T23:09:01+5:30

मतमतांतरे : मायनिंगबाधित क्षेत्र सामील करण्याची मागणी

Resistance to the Eco-sensitive zones of Bandhavites | बांदावासीयांचा इको सेन्सिटिव्ह झोनला विरोध

बांदावासीयांचा इको सेन्सिटिव्ह झोनला विरोध

Next

बांदा : इको- सेन्सिटिव्ह झोनमुळे बांदा शहरातील विकासकामांवर दूरोगामी परिणाम होणार असल्याने बांदा येथे घेण्यात आलेल्या जनसुनावणीत इको सेन्सिटिव्ह झोनला प्रखरपणे विरोध करण्यात आला. मात्र, शहरातील प्रस्तावित सीमा तपासणी नाक्याचे क्षेत्र व शहरातील मायनिंगबाधित सर्व्हे नंबर इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये घेण्याच्या ठरावावर संमती देण्यात आली. एकंदर जनसुनावणीत ग्रामस्थांची मतमतांतरे दिसून आली.बांदा शहरातील इको सेन्सिटिव्ह झोनमधील परिसंवेदनक्षेत्रातील सीमा ठरविणे, या झोनमधून कोणते क्षेत्र वगळावे या झोनचे फायदे तोटे याबाबत ग्रामस्थांची मते जाणून घेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी साडेतीन वाजता येथील आनंदी मंगल कार्यालयात जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, पंचायत समिती सदस्या श्वेता कोरगावकर, ग्रामसेवक संदीप बांदेकर, तांत्रिक अधिकारी संजय सावंत, वनपाल एस. एस. शिरगावकर, कृषी सहाय्यक देसाई, तलाठी एस. व्ही. नलावडे आदि उपस्थित होते.तांत्रिक अधिकारी संजय सावंत यांनी इको सेन्सिटिव्ह झोनबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. बांदा हे विस्तारीत होणारे शहर असून भविष्यात याठिकाणी नगरपंचायत होणार आहे. तसेच शहरात सीआरझेड लागू असल्याने याठिकाणी बांधकामाला मर्यादा आहेत. त्यात इको-सेन्सिटिव्ह झोन लागू झाल्यास येथील प्रस्तावित विकासकामांवर निर्बंध येणार आहेत. त्यामुळे या झोनला विरोध करण्यात आला. शहरातील सटमटवाडी येथे झोन लागू करण्यासंदर्भात ग्रामस्थांनी समर्थन दिले. तर सटमटवाडी येथील प्रस्तावित सीमा तपासणी नाक्याचे क्षेत्र तसेच शहरातील मायनिंगसाठी जाहीर करण्यात आलेले सर्व्हे नंबर इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ठ करुन शहरातील इतर क्षेत्र या झोनमधून वगळावे असा ठराव घेण्यात आला. या जनसुनावणीत माजी सरपंच शितल राऊळ, श्रीकृष्ण काणेकर, मंदार कल्याणकर, गुरु सावंत, अन्वर खान, जिवबा वीर, प्रशांत पांगम, ओंकार आळवे, अरुण मोर्ये, शेखर गोवेकर, म. गो. सावंत आदींसह ग्रामस्थांनी आपले प्रश्न मांडले आहेत. मात्र, शहराची लोकसंख्या सात हजारच्या घरात असूनही या जनसुनावणीला हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच ग्रामस्थ उपस्थित
होते. (प्रतिनिधी)

Web Title: Resistance to the Eco-sensitive zones of Bandhavites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.