२00 शिक्षकांचा नेत्रदानाचा संकल्प

By Admin | Published: December 15, 2015 09:50 PM2015-12-15T21:50:52+5:302015-12-15T23:32:42+5:30

सर्वश्रेष्ठ दान : महिला बालकल्याण सभापतींचाही समावेश

Resolution of 200 teachers | २00 शिक्षकांचा नेत्रदानाचा संकल्प

२00 शिक्षकांचा नेत्रदानाचा संकल्प

googlenewsNext

चिपळूण : नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या मृत्यूनंतर आपल्या डोळ्यांमुळे गरजूंना दृष्टी मिळणार असेल तर ते ईश्वरी कार्य आहे, असे समजून सावर्डे प्रभागातील २०० शिक्षकांसह महिला बालकल्याण सभापती प्रज्ञा धनावडे, माजी उपसभापती शशिकांत दळवी, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत जाधव आदी मान्यवरांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प सोडून आपले फॉर्म भरले.
निमित्त होते हिवाळी क्रीडा स्पर्धांचे! हिवाळी क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती धनावडे यांनी केला. यावेळी माजी सभापती शशिकांत दळवी, पंचायत समिती सदस्य जाधव, खेरशेतचे सरपंच दिलीप मोरे, कोकरे सरपंच संजय घडशी, उपसरपंच संजय दळवी, मांडकी खुर्द सरपंच योगेश गुढेकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कोकरे - बुदरवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेल्या या क्रीडा स्पर्धेला सावर्डे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सशाली मोहिते यांनी हा अनोखा सामाजिक उपक्रम घडवून आणला. शिक्षकांनीही त्यांना चांगला प्रतिसाद दिला. नेत्रदानासारख्या पवित्र कार्याचे महत्त्व विस्तार अधिकारी मोहिते यांनी पटवून दिले. नेत्रदानासाठी जनजागृती होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी भरलेले २०० फॉर्म सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण या संस्थेकडे सुपूर्द केले. सभापती धनावडे यांनी मोहिते यांच्या या कार्याचा गौरव केला व आपल्याला ही चांगली संधी मिळवून दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. (प्रतिनिधी)


हिवाळी क्रीडा स्पर्धेचे निमित्त साधून शिक्षण विस्तार अधिकारी मोहिते यांनी सोडला नेत्रदानाचा संकल्प.
क्रीडा स्पर्धांना परिसरातील विद्यार्थ्यांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
परिसरातील लोकप्रतिनिधींनीही भरले नेत्रदानाचे अर्ज.
या अनोख्या उपक्रमाचे व संकल्पाचे ग्रामस्थांनी केले कौतुक.

Web Title: Resolution of 200 teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.