दुखंडे यांच्या निषेधाचा ठराव

By admin | Published: September 23, 2016 11:23 PM2016-09-23T23:23:53+5:302016-09-23T23:23:53+5:30

काँग्रेस सदस्य आक्रमक : मालवण पंचायत समिती सभेत गदारोळ

Resolution of ban on clauses | दुखंडे यांच्या निषेधाचा ठराव

दुखंडे यांच्या निषेधाचा ठराव

Next

मालवण : मालवण पंचायत समितीच्या सभेत सी-वर्ल्ड प्रकल्पाच्या ठरावाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी काँग्रेस सदस्य आक्रमक बनले. विरोधी सदस्य उदय दुखंडे यांच्यावर सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप करताना दुखंडे हे सभागृहाचा अवमान करत आहेत. पंचायत समिती ठरावाला किंमत नाही अशी सभागृहाबाहेर भूमिका घेणाऱ्या दुखंडे यांनी माफी मागावी अन्यथा राजीनामा द्यावा, असे सांगत काँग्रेस सदस्यांनी सभा सुरु न करण्याचा पवित्रा घेतला.
अखेर दुखंडे यांनी आपली भूमिका सभागृहाचा अवमान करणारी नव्हती असे स्पष्ट केले. मात्र, काँग्रेस सदस्यांचे समाधान न झाल्याने दुखंडे यांच्या विरोधात निषेधाचा ठराव बहुमताने घेण्यात आला.
पंचायत समिती सभेच्या ठरावाला महत्व नसल्याचे वक्तव्य करणाऱ्या शिवसेना पंचायत समिती सदस्य उदय दुखंडे यांच्या वक्तव्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस सदस्य राजेद्र्र प्रभुदेसाई, देवानंद चिंदरकर, उदय परब, प्रसाद मोरजकर यांनी सभागृह दणाणून सोडले. यापुढे दुखंडे यांच्या कोणत्याही ठरावाला काँग्रेस सदस्य अनुमोदन देणार नाहीत, असे सांगताना पंचायत समिती सभागृहाच्या विरोधात दुखंडे यांनी कोणतीही भूमिका अथवा वक्तव्य केल्यास त्यांना सभागृहात पाय ठेवू दिला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका चिंदरकर यांनी मांडली.
पंचायत समितीची मासिक सभा पंचायत समिती सभागृहात सभापती हिमाली अमरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती छोटू ठाकूर, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, राजेंद्र्र प्रभूदेसाई, उदय परब, प्रसाद मोरजकर, श्रद्धा केळुसकर, भाग्यता वायंगणकर, सुजला तांबे, चित्रा दळवी यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी दुखंडे यांच्या विरोधात काँग्रेस सदस्यांनी ११ विरुद्ध १ असा बहुमताने निषेधाचा ठराव मंजूर केला. (प्रतिनिधी)

दुखंडे यांचा खुलासा : मात्र, कॉँग्रेस सदस्यांची आक्रमक भूमिका
मागील महिन्यात झालेल्या सभेत सी-वर्ल्ड प्रकल्प ३५० एकर मध्ये व्हावा, असा ठराव घेण्यात आला होता. या ठरावाला शिवसेना सदस्य उदय दुखंडे यांनी विरोध दर्शवला नव्हता. मात्र, दुखंडे यांनी दुसऱ्या दिवशी वायंगणी येथे पत्रकार परिषद घेत पंचायत समिती ठरावाला किंमतच नसल्याचे सांगितले होते. शुक्रवारी सभागृहात गदारोळ झाला असताना आपण सभागृहाचा कोणताही अवमान केला नाही, असे सांगत सभागृहाबद्दल आपल्याला आदर व सन्मानाची भावना असल्याचे स्पष्ट केले. मात्र काँग्रेस सदस्यांची आक्रमक भूमिका कायम राहिली. अखेर उदय परब यांनी दुखंडे यांच्या वक्तव्याबाबत निषेधाचा ठराव घेतला. याला काँग्रेसच्या सर्व सदस्यांसह सभापती हिमाली अमरे व उपसभापती छोटू ठाकूर यांनीही पाठींबा दर्शवला. तर देवानंद चिंदरकर यांनी ठरावाला अनुमोदन दिले.
 

Web Title: Resolution of ban on clauses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.