तालुकास्तरावरील याद्या तत्काळ रद्द करण्याचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 05:28 PM2021-04-01T17:28:19+5:302021-04-01T17:31:12+5:30
Zp Sindhudurg- जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्ध विकास समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यानी मंजूर केलेल्या वैयक्तिक लाभाच्या याद्या सदस्यांना समान न्याय देणाऱ्या नाहीत. सत्ताधारी सदस्यांना झुकते माप देणाऱ्या आहेत. समिती सदस्य असणाऱ्या विरोधी सदस्यांवरसुद्धा अन्याय करण्यात आला आहे, असे विरोधी सदस्या स्वरूपा विखाळे यांनी सांगितले. यावर सभाध्यक्षा गावडे यांनी मंजूर होऊन तालुका स्तरावर गेलेल्या याद्या तत्काळ रद्द करण्याचा ठराव घेतला.
ओरोस : जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्ध विकास समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यानी मंजूर केलेल्या वैयक्तिक लाभाच्या याद्या सदस्यांना समान न्याय देणाऱ्या नाहीत. सत्ताधारी सदस्यांना झुकते माप देणाऱ्या आहेत. समिती सदस्य असणाऱ्या विरोधी सदस्यांवरसुद्धा अन्याय करण्यात आला आहे, असे विरोधी सदस्या स्वरूपा विखाळे यांनी सांगितले. यावर सभाध्यक्षा गावडे यांनी मंजूर होऊन तालुका स्तरावर गेलेल्या याद्या तत्काळ रद्द करण्याचा ठराव घेतला.
म्हापसेकर यांनी राजीनामा दिल्याने विरोधी सेनेचे एकतर्फी बहुमत समितीत झाले आहे. परिणामी मंगळवारी झालेल्या समिती सभेत सेनेचे तीन सदस्य उपस्थित राहिल्याने सभेचे अध्यक्षपद रोहिणी गावडे यांच्याकडे गेले.
उपाध्यक्ष म्हापसेकर यांनी ३० मार्च रोजी पशुसंवर्धन व दुग्ध विकास समितीची मासिक सभा लावली होती. मात्र, २६ मार्च रोजी सभापती निवडीत डॉ. अनिशा दळवी यांना स्थान दिल्याने त्यांनी तत्काळ सभापती व जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे बुधवारी सभेला अध्यक्ष कोण ? ही चर्चा सुरू होती. सभा ११.३० वाजता होती. ती १२ वाजता सभा सुरू झाली. त्यावेळी केवळ रोहिणी गावडे, स्वरूपा विखाळे, अनुप्रिती खोचरे या तीन सदस्या उपस्थित होत्या.
या तिन्ही सदस्या विरोधी पक्ष सेनेच्या आहेत. यानंतर समिती सचिव तथा जिल्हा पशुसंवर्धन व दुग्ध विकास अधिकारी डॉ. दिलीप शिंपी यांनी उपस्थित सदस्यांना विनंती करीत आपल्यातून एक सभाध्यक्ष निवडण्याची मागणी केली. यावेळी विखाळे यानी रोहिणी गावडे यांचे नाव सुचविले. त्यानुसार रोहिणी गावडे सभाध्यक्षा झाल्या. सभाध्यक्षा गावडे व विखाळे आपल्या म्हणण्यावर ठाम राहिल्या. त्यामुळे प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे. विरोधी सदस्य असताना सभाध्यक्ष या समितीत एकूण ९ सदस्य आहेत.
सभापती म्हापसेकर, मनस्वी घारे, वेंगुर्ला सभापती अनुश्री कांबळी, देवगड सभापती, कणकवली सभापती, सावंतवाडी सभापती या सहा सदस्यांसह सभेला उपस्थित असलेल्या रोहिणी गावडे, स्वरूपा विखाळे, अनुप्रिती खोचरे यांचा यात समावेश आहे. सभेला म्हापसेकर यांच्यासह घारे व कांबळी अनुपस्थित राहिल्या.
कणकवली, देवगड व सावंतवाडीच्या जुन्या सभापतींनी राजीनामे दिल्याने तेथे नवीन सभापती विराजमान आहेत. परंतु, जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत त्यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली नाही. परिणामी सेनेचे असलेले तीन सदस्य उपस्थित राहिल्याने विरोधक असतानाही रोहिणी गावडे यांना सभाध्यक्ष पद भूषविण्याचा मान मिळाला.